'महाराष्ट्राच्या नकली चाणक्यची लेवल...', भुजबळ मंत्री झाल्यानंतर राऊतांचा टोला!

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.

प्रविण दाभोळकर | Updated: May 20, 2025, 08:52 PM IST
'महाराष्ट्राच्या नकली चाणक्यची लेवल...', भुजबळ मंत्री झाल्यानंतर राऊतांचा टोला!
छगन भुजबळ

Chhagan Bhujbal: धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद छगन भुजबळांना मिळाले आणि त्यांनी मंत्री पदाची शपथदेखील घेतली. आता भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा पदाची जबाबदारी असणार आहे. दरम्यान भुजबळांना मंत्रीपद मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

मंत्रिपदावरुन तापलं होतं राजकारण 

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळांच्या नावाची चर्चा होती. मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादीत नाराज होते, त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. भुजबळांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याचा छगन भुजबळ यांच्याकडे मोठा अनुभव आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला पार पडला. यावेळी काही आमदारांना मंत्रीपदाची शपत देण्यात आली. या पहिल्या टप्प्यात धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ हे नाराज झाले होते. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले. या प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला. धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रीपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव आला. अखरे फेब्रुवारी 2025 मध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा जारीनामा द्यावा लागला. अन्न व नागरी पुरवठा या खात्याचे मंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे होते. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीत  मंत्रिपदाची जागा रिकामी झाली होती.

काय म्हणाले संजय राऊत?

छगन भुजबळ फडणवीस यांच्या मंत्री मंडळात सन्मानीय मंत्री झाले याचा मला मनस्वी आनंद होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. यामुळे संपूर्ण भाजपा,महाराष्ट्राचा नकली चाणक्य यांची “लेवल जनतेला समजली, अशी टीका राऊतांनी केली. मुलुंडचा **** पोपटलाल तर बेवा झाला!ढोंगी आणि बकवास लेकाचे!, अशी टीका त्यांनी केली.