'हे सगळे भोग आहेत...', वैष्णवी हगवणे प्रकरणावर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले, कुटुंबाला म्हणाले 'नुसतं घरी बसून...'

संतोष देशमुख यांचं कुटुंबीय पुण्याच वैष्णवी हगवणेचे वडील आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी पुण्यात दाखल झाले होते.   

शिवराज यादव | Updated: May 27, 2025, 07:03 PM IST
'हे सगळे भोग आहेत...', वैष्णवी हगवणे प्रकरणावर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले, कुटुंबाला म्हणाले 'नुसतं घरी बसून...'

पुण्यातील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणावेत यासाठी सासरा राजेंद्र हगवणे आणि सासरच्यांनी वैष्णवीचा मानसिक आणि शारिरीक छळ केला, ज्यामुळे तिने जीवन संपवलं. दरम्यान पोलिसांनी कोर्टात तिच्या हत्येचाही संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी संपूर्ण हगवणे कुटुंबाला बेड्या ठोकल्या आहेत. घटना उघड झाल्यानंतर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी वैष्णवीच्या माहेरी कस्पटे कुटुंबाला भेट देण्यासाठी रांगा लावल्या आहेत. त्यातच आज बीडमधील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) कस्पटे कुटुंबाच्या भेटीसाठी पुण्यात पोहोचले होते. 

Add Zee News as a Preferred Source

पुण्यात पावसाने धुमाकूळ घातलेला असताना त्या पावसातच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) आणि मुलगी वैभवी इतर कुटुंबीयांसह कस्पटे कुटुंबाच्या भेटीसाठी दाखल झाले होते. त्यांनी वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. तसंच हा लढा कायदेशीर प्रक्रियेने लढण्यासंदर्भात चर्चा केल्याचं समजत आहे. यावेळी त्यांनी वैष्णवीच्या आईचीही भेट घेतली. ही भेट सांत्वनपर असल्याची माहिती मिळत आहे. धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख यांच्यासह संतोष देशमुख यांचे सुपुत्र विराज देशमुखही येथे भेटीसाठी पोहोचले होते. 

वैष्णवी सरणावर असताना सासरा राजेंद्र हगवणे मटणावर मारत होता ताव; धक्कादायक CCTV आलं समोर

 

धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद सांगितलं की, "आमचं आणि त्यांचं दुःख सारखं आहे. आमचाही माणूस गेला आहे. छोटं बाळ आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचं बळ दिलं पाहिजे. हे सगळे भोग आहेत भोगावे लागतात. कस्पटे कुटुंबांना ह्यातून पुढं यावं". 

'अगं माझा नवराच मला..., तिथंच चूक झाली', वैष्णवीचा आत्महत्येपूर्वी मैत्रिणीसोबतचा कॉल आला समोर; 'मला फालतू...'

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अखेर आला समोर; धक्कादायक माहिती उघड

पुढे ते म्हणाले, "खरी परीक्षा पुढं आहे, आपल्याला सिद्ध करावं लागणारआहे. योग्य दिशा शोधली पाहिजे. न्याय घरी बसून मिळत नाही . त्यासाठी रस्त्यावर यावं लागतं, उपोषण करावं लागतं. आमच्या भावान काय पाप केलं होतं? परंतु न्याय मागावा लागत आहे". 

28 मेपर्यंत पोलीस कोठडी

सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, पोलिसांनी चार्जशीटमध्ये खूनाचा संशय व्यक्त केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. 23 मे रोजी पहाटे 4.30 वाजता दोघांना पोलिसांनी अटक केली. 

अटक केल्यानंतर आज हगवणे बाप-लेकाला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी रिमांड कॉपीत हत्येचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More