Walmik Karad Custody : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडबद्दल (Walmik Karad) बीड कोर्टात आज एसआयटीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आज बीड कोर्टात झालेल्या सुनावणीत SIT ला मोठं यश मिळालंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला बीड कोर्टाने कराडला 7 दिवसांसाठी SIT कोठडीत पाठवलंय.
दरम्यान या प्रकरणी आज एसआयटीने बीड कोर्टात वाल्मिक कराडबद्दल मोठे खुलासे केलेत. ज्यात 9 डिसेंबर रोजी जेव्हा संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये फोनवरून संभाषण झाले. या दरम्यान तिघांमध्ये त्या दिवशी नेमकं काय बोलणं झाला याचा तपास एसआयटीला करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या दहा दिवसाच्या कस्टडीची मागणी SIT तर्फे करण्यात आली होती. या मागणीला आता बीड कोर्ट मान्यता देते 7 दिवसांसाठी SIT कोठडीत पाठवलं आहे.
दरम्यान वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशी संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा मोठा दावाही एसआयटीकडून आज बीड कोर्टात करण्यात आला.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या गडगंज संपत्ती बाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात देखील वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे वाकडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतच्या 6व्या मजल्यावर 601 नंबर चा 3.15 कोटीपेक्षा अधिक किमतीचा 4 बीएचके फ्लॅट असल्याचे समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे कराडने या त्याचा फ्लॅटचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मिळकत कर न भरल्यामुळे कर संकलन विभागाने त्याच्या या फ्लॅट वर नोटीस सुद्धा लावली आहे. वाकडमधील कराडचा फ्लॅट महापालिका जप्त करणार आहे, अशी माहिती समोर आलीय. वाल्मिक कराडकडे 1 लाख 55 हजारांचा मालमत्ता कर थकित असून पिंपरी चिंचवड महापालिकेने नोटीस बजावली असल्याची माहिती मिळाली आहे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
SL
(20 ov) 163/6
|
VS |
IRE
143(19.5 ov)
|
| Sri Lanka beat Ireland by 20 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 184/7
|
VS |
NEP
180/6(20 ov)
|
| England beat Nepal by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AFG
(20 ov) 182/6
|
VS |
NZ
183/5(17.5 ov)
|
| New Zealand beat Afghanistan by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.