सर्वात मोठी अपडेट! संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा एक सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती लागलाय. या व्हिडीओमध्ये सर्व आरोपी एकत्र दिसत आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Jan 21, 2025, 02:53 PM IST
सर्वात मोठी अपडेट! संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती
सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती

Santosh Deshmukh Murder Case : बीड मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सर्वात मोठा अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुऱ हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही झी 24 तासच्या हाती लागलाय. या सीसीटीव्हीमध्ये सर्व आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे एकत्र दिसत आहे. खात्रीदायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर 2024 ला विष्णू चाटे याच्या कार्यालयात बैठक झाली होती. त्याच दिवशी खंडणी मागण्यात आली होती. ही बैठक केजमध्ये झाली होती. याच दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती. सीसीटीव्हीमध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, बालाजी तांदळे, प्रतीक घुले हे सर्वच आरोपी दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी पाटीलही या सीसीटीव्हीत दिसतोय.

Add Zee News as a Preferred Source

पाहा व्हिडीओ

विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयास्पद भूमिका असलेले आणि निलंबित पीएसआय राजेश पाटील हेदेखील या फूटेजमध्ये दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्यात. यात पाटील वाल्मिक कराडला भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने हा सर्वात मोठा पुरावा मानला जातोय.

राजेश पाटील यांचा विष्णू चाटे याला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडीओमध्येही संतोष देशमुख हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसोबत राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा मोठा पुरावा मानला जातोय. यापूर्वी केज शहरातील बसंत बिहार या उडपी हॉटेल मधला सीसीटिव्ही व्हिडिओ समोर आलं होतं. ज्यात  पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले आणि मयत संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हा देखील त्या दोघांसोबत चर्चा करत आहे.

सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्घृणपणे अमानवीय पद्धतीने करण्यात आली होती. 6 डिसेंबर 2024 ला झालेल्या आवादा कंपनीच्या स्टोर यार्डवरील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. यानंतर 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. टोल नाक्यावरून देशमुख यांचे अपहरण करण्यात आले, त्यानंतर त्यांना जबर मारहाण देखील करण्यात आली होती. ही मारहाण इतकी भयानक होती की त्यांच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. मात्र आता या प्रकरणाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. 

देशमुख यांची हत्या करण्याआधी एक दिवस आरोपींनी बीड अंबाजोगाई महामार्गावरील तिरंगा हॉटेलवर जेवण केल्याचं समोर आले आहे. त्यामुळे याच हॉटेलवर देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याच उघड होत आहे.

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More