तुषार तपासे, झी 24 तास, सातारा : वाद कधीकधी इतके विकोपाला पोहोचतात की विकृतीचा कळस गाठतात. माणूसकी संपते आणि बदला घेण्याची भावना अधिक दृध होते. मोठ्या लोकांच्या वादाचा परिणाम चिमुकल्याला भोगावा लागला. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौटुंबिक वादातून बदला घेण्याची भावना निर्माण झाली. रागातून चक्क भावाच्याच दहा महिन्यांच्या बाळाच्या जीवावर काका उठल्याने खळबळ उडाली आहे. भावांच्या भांडणात चिमुकल्याचा नाहक बळी गेला. त्याची काही चूक नसतानाही केवळ रागाच्या आणि सूडाच्या भावनेतून काकानेच भाच्याला संपवलं.


ही धक्कादायक घटना साताऱ्यातील कोडोली परिसरात घडली आहे. कौटुंबिक वादातून स्वतःच्या भावांच्या दहा महिन्याच्या बाळाला एका नराधमाने विहिरीत टाकलं. यामध्ये बाळाचा मृत्यू झाला असून आरोपी काका फरार आहे. 


या मृत बाळाच्या आई वडिलांचा आक्रोश हृदय पिटाळून टाकणारा आहे. सातारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.