)
Satara Doctor Suicide Case : फलटण महिला डॉक्टर प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. त्या महिला डॉक्टरसोबत आत्महत्यापूर्वी नेमकं काय घडलं, यासंदर्भात पोलिसांना हॉटेल रुममधील सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहेत. फलटणमधील ज्या हॉटेल रुममध्ये त्या महिला डॉक्टराने गळफास घेतली. शिवाय मृत्यूपूर्वी तिने आपल्या तळहातावर सुसाइट नोट लिहिली होती. ज्यात निलंबीत पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आता पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फूटेजमधून महत्त्वाचे धागेदारे समोर येतील असं पोलिसांना वाटतं.
महिला डॉक्टराने तळहातावर लिहिलं होतं की, गोपाळ बदने या व्यक्तीने अत्याचार केला तर प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली तर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता ज्या हॉटेल रुममध्ये त्या महिलेने आत्महत्या केली, तिथले सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान फलटण महिला डॉक्टर प्रकरणात सोमवारी पोस्टमर्टम रिपोर्ट मिळणार असल्याच बोलं जातंय. त्याशिवाय प्राथमिक अहवालात महिला डॉक्टराने आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. तसंच आरोपीच्या घराची झाडाझडती पोलिसांनी घेतली असून डिजिटल गोष्टी जप्त केल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि डॉक्टर महिला ही संपर्कात असल्याच समोर आलं आहे. महिलेने आपल्यासोबत 4 वेळा बलात्कार झाल्याच सुसाइट नोटमध्ये लिहिलंय. तसंच पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, महिला डॉक्टराने आत्महत्या करण्यापूर्वी बनकरशी बोलणं झालं होतं. आता पोलीस या आत्महत्येमागे अजून काही कारणं आहेत का याचा शोध घेत आहेत. दरम्यान आता या सीटीटीव्ही फुटेजमधून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होणार असं पोलिसांनी सांगितलं आहे.
प्रश्न १: फलटण प्रकरणात नेमके काय घडले?
उत्तर: फलटणमधील एका महिला डॉक्टराने हॉटेल रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी तिने तळहातावर सुसाइट नोट लिहिली, ज्यात निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात यामुळे खळबळ माजली आहे.
प्रश्न २: सुसाइट नोटमध्ये कोणते आरोप केले गेले?
उत्तर: सुसाइट नोटमध्ये गोपाळ बदने याने अत्याचार केल्याचा आणि प्रशांत बनकरने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. तसेच, तिच्यासोबत ४ वेळा बलात्कार झाल्याचेही लिहिले आहे.
प्रश्न ३: पोलिसांना कोणता मोठा पुरावा मिळाला आहे?
उत्तर: पोलिसांना हॉटेल रुममधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. या फुटेजमधून आत्महत्यापूर्वी नेमके काय घडले याचे महत्वाचे धागेदोरे समोर येतील, असा विश्वास पोलिसांना आहे.