)
साताऱ्याच डॉ. संपदा मुंडेने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. या प्रकरणाला आता वेगळंच वळण आलं आहे. या प्रकरणात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला पंढपुरहून ताब्यात घेण्यात आलं. आता बनकरला फलटण कोर्टात दाखल करण्यात आलं आहे. पण या प्रकरणात वेगवेगळे पैलू समोर येत आहेत. या प्रकरणात आणखी एक आरोपी पोलीस उपनिरिक्षक गोविंद बदने फरार आहेत.
प्रशांत बनकर हा स्थानिक रहिवाशी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. प्रशांत बनकर हा निर्दोष असल्याचं त्याचा बहिणीचं म्हणणं आहे. तसे पुरावे सुद्धा प्रशांतच्या मोबाईलमध्ये असल्याचं बहिणीने सांगितलंय.. ही डॉक्टर महिलाच माझ्या भावाच्या मागे लागली होती आणि तसा तिने प्रपोज केल्याचं देखील पुरावे असल्याचं बनकर यांच्या बहिणीचं म्हणणं आहे आहे. पोलीस तपासात हे सगळं समोर येईल असं देखील बनकर यांच्या बहिणीने सांगितलंय.. संबंधित डॉक्टर युवती ही मेंटली डिस्टर्ब असल्याचे देखील बनकर यांच्या बहिणीचं सांगणं आहे.
फलटणमध्ये वैद्यकीय अधिकारी असलेल्या संपदा मुंडे यांनी आपला जीव संपवला. त्यांनी सुसाईड नोट लिहिली. त्यात काही नावे देखील आहेत. मी काही कागदपत्रे ट्विट केलं होतं. एक पोलीस उपाधिक्षक आहेत त्यांच्याकडे 19 जूनला या महिलेने पत्र लिहिल होतं त्यावर कारवाई काय झाली यासाठी देखील एक पत्र लिहिण्यात आलं आहे. संपदा मुंडे यांनी पत्रात स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. भाजप खासदार निंबाळकर यांचा सहभाग आहे. माजी खासदार यांनी संपदा मुंडे यांच्या सोबत नागटिळक नावाच्या पीएच्या फोनवरून बोलले आणि त्यांनी या महिलेला एका व्यक्तीसाठी फिट अनफिट प्रमाणपत्र मागितले.
साताऱ्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टर आत्महत्या केली. तिच्या हातावरती एक सुसाईड नोट आदळली त्यावरती तिने दोन जणांची नावे लिहिली. त्यांनी तिच्यावरती अत्याचार केला तिला मानसिक शारीरिक त्रास दिला. असं या सुसाईड नोट मधून समोर आले आहे. याप्रकरणी महिला डॉक्टर संपदा मुंडे यांची तक्रार न घेणारे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणात आरोपी करा. आम्ही बीडचे आहोत म्हणून आम्हाला कोणी हिनावत असेल तर ते बरोबर नाही. बीडचे लोक बुद्धिमान आहेत प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. याप्रकरणी एसआयटी स्थापन करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे