चंद्रकांत फुंदे झी 24 तास पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे असा सामना रंगला आहे. एकीकडे ठोंबरे पाटलांना पक्षाने नोटीस पाठवली आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी पुराव्यासह उत्तर देणार असं चाकणकरांनी म्हंटलय...त्यामुळे आता राष्ट्रवादीतील हा वाद पुढे काय वळण घेतो, हे पाहावं लागेल.
फलटण महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून रूपाली ठोंबरेंनी रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केला होता, रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करत रूपाली ठोंबरेंनी आंदोलन देखील केलं होतं. दरम्यान यानंतर आता राष्ट्रवादी पक्षानं रूपाली ठोंबरेंकडे खुलासा मागितलाय. तसंच दोन्ही रूपालींना बोलावून अजित पवारांनी समज दिल्याचं देखील कळतं आहे. मात्र, तरीही रूपाली ठोंबरे या आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. महिलांची सुरक्षा सोडून उलट महिला आयोगाकडून महिलांचं शोषण आणि छळ सुरू असल्याचं रोखठोक मत अजित पवारांसमोर मांडल्याचं रूपाली ठोंबरेंनी म्हटलंय. तर पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांचं उत्तर देणार असल्याचा पलटवार चाकणकरांकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीकडून रूपाली ठोंबरेंना वक्तव्यावर खुलासा करण्यासाठी सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. दरम्यान यानंतर पक्षाकडे सात दिवसात खुलासा करणार असल्याचं रूपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
रूपाली विरूद्ध रूपाली प्रकरणात माधवी खंडाळकरची देखील एन्टी झाली आहे. रूपाली ठोंबरेंनी चाकणकरांविरोधात आवाज उठवल्यानंतर माधवी खंडाळकर ठोंबरेंविरोधात मैदानात उतरल्या होत्या, यानंतर रूपाली ठोंबरेंच्या बहिणीनं मारहाण केल्याचा आरोप माधवी खंडाळकरांनी करत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर कोणाच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला याचा तपास करण्यास सांगितल्याचं ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
महिला डॉक्टराच्या आत्महत्येनंतर रूपाली चाकणकरांनी डॉक्टर महिलेचा आणि आरोपींमधला संवाद माध्यमांसमोर सांगितला होता. दरम्यान यानंतर रूपाली चाकणकरांनी डॉक्टर महिलेचं चारित्र्यहनन केल्याचा आरोप रूपाली ठोंबरेंनी केला होता. आत्महत्या करणार असा मॅसेज डॉक्टरनं बनकरला केला होता.
डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणावरून रूपाली ठोंबरेंनी आरोप केल्यानंतर पक्षानं त्यांच्याकडे खुलासा मागितला आहे.. त्यामुळे सात दिवसात रूपाली ठोंबरे पक्षाकडे कोणता खुलासा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.