'ते' घर 60 वर्ष जुनं; खोक्याचे बीडमधील ग्लास हाऊस पाडल्यानंतर सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ

खोक्याचे बीडमधील ग्लास हाऊस पाडल्यानंतर सुरेश धस यांनी त्याचे समर्थन केले आहेत. कोणत्या कायद्यानुसार घर पाडले असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.  

वनिता कांबळे | Updated: Mar 16, 2025, 06:37 PM IST
 'ते' घर 60 वर्ष जुनं; खोक्याचे बीडमधील ग्लास हाऊस पाडल्यानंतर सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ

Satish Bhosale Beed :  बीडच्या शिरूरमध्ये मारहाण प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्या याला अटक झाली आहे. खोक्या सध्या तुरुंगात आहे. सतीश भोसले याला अटक केल्यानंतर 13 मार्च रोजी त्याचे व्हाईट हाऊस जमीनदोस्त करण्यात आले. खोक्याने बीडमध्ये वन विभागाच्या जमिनीवर बेकायदा घर बांधले होते. वन विभागाने धडक कारवाई करत हे पाडले आहे. खोक्या हा धस यांचा कार्यकर्ता आहे.  त्या पार्श्वभूमीवर धस यांनी खोक्याच्या घरी भेट दिली. 

खोक्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून वास्तव्यास होता. वनविभागाच्या जागेवर त्याने एक ग्लास हाऊस उभारल होते. खोक्या भाई रहात असलेल्या परिसरात वनविभागानं कारवाई करत अतिक्रमण उठवले. मात्र, खोक्याच्या ग्लास हाऊसवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नव्हती. 

कुणाचं घर पाडणं ही चांगली गोष्ट नाही. ती कारवाई का करण्यात आली याबाबत बीडच्या जिल्हाधिका-यांकडून माहिती घेणार असल्याचं भाजप आमदारस सुरेश धस यांनी सांगितलं.  वनविभागाने ही घर पाडली कोणत्या नियमाने केलं त्याची उत्तरे मिळणे गरजेचं आहे अस म्हणत सुरेश धस यांनी सतीश उर्फ खोक्याचे समर्थन केले आहे.  

तो एवढा मोठा नाही जेवढा मोठा करून दाखवला. त्याची परिस्थिती काय झाली हे बघा त्याला राहायला घर नाही.  जे त्याला त्याची शिक्षा मिळाली होती. त्याच्यावर 307 झाला आहे तो अटकही झाला आहे. मात्र वनविभागाने कोणतीही नोटीस न देता त्याचे घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे सुरेश धस यांनी उपस्थित  सवाल केल.

या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आम्ही विचार करू. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत करण्याचा प्रयत्न आहे.  शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड शून्य टक्क्यावर आले.  हे लपवण्यासाठी असे कृत्य वनविभागाने केले. मी वनविभाग कायद्यानुसार हे कोणत्या कायद्यानुसार केले याची माहिती घेणार.  हे घर साठ वर्षांपूर्वीच आहे. हे कोणत्या नियमात बसते. 

सतीश भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्ती वरून तक्रार दाखल केली होती. याचे घर पाडण्याचे कारण काय? कुणाच्या दबावाखाली केले हेच आम्ही बघत आहोत.   जिल्ह्यातील जुने व्हिडिओ काढायचे आणि कोणाच्या बदनाम्या करायच्या असा प्रकार सुरू आहे. देशमुख प्रकरण वळवण्यासाठी हे सुरू असल्याचा आरोप धस यांनी केला.  दादा खिंडकर स्वतः सरेंडर झाला आहे. नसलेला गुन्हा त्याच्यावर टाकला आहे. त्याचे चुकले काय? मारहाण चुकीच्या पद्धतीने केली जी फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती रास्त आहे.