...पण, सेनेलाही जिंकू देणार नाही, राणेंनी बांधला चंग
नारायण राणे यांच्याकडे निर्णायक ९६ मतं आहेत.
रत्नागिरी : कोकण विधान परिषद निवडणुकीत उमेदवार देणार नाही. मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला ही निवडणूक जिंकू देणार नाही, असा इशाराच खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. त्याचवेळी नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंब्याचे संकेत दिले आहेत. नारायण राणे यांच्याकडे निर्णायक ९६ मतं आहेत. येत्या सोमवारी ७ मे रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याबाबत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं राणेंनी सांगितलंय. त्याआधी नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या व्यूहरचनेच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करणार आहेत.