संतोष देशमुख हत्येची A टू Z स्टोरी; उज्ज्वल निकम यांनी उलगडला सगळा घटनाक्रम

संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकील उज्ज्वल निकमांनी कोर्टात पहिल्यांदा युक्तिवाद केला. 

शिवराज यादव | Updated: Mar 26, 2025, 09:35 PM IST
संतोष देशमुख हत्येची A टू Z स्टोरी; उज्ज्वल निकम यांनी उलगडला सगळा घटनाक्रम

संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकील उज्ज्वल निकमांनी कोर्टात पहिल्यांदा युक्तिवाद केला. दरम्यान यानंतर त्यांनी हत्येचा पूर्ण घटनाक्रम कोर्टासमोर मांडला. तसंच वाल्मिक कराडचा या हत्येशी कसा संबंध आहे? यासंदर्भातल्या पुराव्यांवर देखील युक्तिवाद करण्यात आला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कोर्टात सुनावणी पार पडली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात युक्तिवाद करत संतोष देशमुखांच्या हत्येची ए टू झेड स्टोरी सांगितली. तसंच वाल्मिक कराडचा खंडणी आणि हत्या प्रकरणाशी कसा संबंध आहे?. यासंदर्भात युक्तिवाद करत उज्ज्वल निकमांनी आपली बाजू कोर्टासमोर मांडली

 

- संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड कोर्टातील युक्तिवाद?

उज्ज्वल निकम, सरकारी वकील

- 8 ऑक्टोबर रोजी खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली

- त्याच दिवशी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मिक कराडसोबत अवादा कंपनीचे भूसंपादन अधिकारी शिवाजी थोपटेंची बैठक झाली

- वाल्मिक कराडनं अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंकडे दोन कोटींची खंडणी मागितली

- यासंदर्भातले टॉवर लोकेशन आणि सीडीआर आहेत, उज्ज्वल निकमांचा युक्तिवाद

- 9 ऑक्टोबरला शिवाजी थोपटेंनी कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळींनी खंडणी मागितल्याची माहिती दिली

- अल्ताफ तांबोळींनी तक्रार न देण्यास शिवाजी थोपटेंना सांगितलं, त्यामुळे गुन्ह्याची नोंद झाली नाही

- 26 नोव्हेंबरला सुदर्शन घुले हा अवादा कंपनीत गेला आणि कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करण्याची धमकी दिली

- 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरुन अवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदेंना फोन केला.

- सुदर्शन घुलेनं सांगितलं त्याप्रमाणे काम अथवा काम बंद करा, अशी धमकी दिली

- सुनील शिंदेंचा फोन स्पीकरवर होता, वाल्मिक कराडची धमकी शिवाजी थोपटेंनी देखील ऐकली

- सुनील शिंदेंनी वाल्मिक कराडचा कॉल रेकॉर्ड केला होता

- 29 नोव्हेंबरला पुन्हा सुदर्शन घुले पुन्हा कराडच्या कार्यालयात गेला आणि मागणी पूर्ण करा असा मॅसेज सुनील शिंदे, थोपटेंना दिला

- त्याच दिवशी वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात भेटले, त्याचं सीसीटीव्ही आहे, निकमांचा युक्तिवाद

- 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, हे साडेबारा वाजता आवादा कंपनीच्या ऑफिसमध्ये आले. 

- सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ आणि जबर मारहाण केली

- मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिली.

- या वादाची माहिती संतोष देशमुखांना मिळाली, त्यानंतर संतोष देशमुख आणि गावातील काही लोक कंपनी परिसरात आले

- त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी घुले व त्याच्या इतर सहका-यांना ताब्यात घेतलं

- दरम्यान कंपनीत घडलेली सर्व माहिती घुलेनी वाल्मिक कराडला दिली

- कामात अडथळा आणतील त्यांना संपवा असं वाल्मिक कराडनं सांगितलं, अशी कबुली घुलेनं दिल्याचं उज्ज्वल निकमांनी सांगितलं

- त्यानंतर 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुखांचं अपहरण करुन त्यांची हत्या केली
--------------------

वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांचा युक्तिवाद 

- उज्ज्वल निकमांनी सांगितलेली घटना त्याचे पुरावे, सीडीआर आम्हाला मिळालेले नाहीत.

- ते पुरावे मिळावेत यासाठी आम्ही अर्ज केला होता. आज पुन्हा अर्ज केलाय.

- हे सर्व पुरावे कागदपत्र मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, विकास खाडेंचा युक्तिवाद

- आरोपीच्या वकीलांना कागदपत्र उपलब्ध करुन द्या, न्यायाधीशांचे आदेश

संतोष देशमुख प्रकरणातील साक्षिदार गोपनीय ठेवण्याची विनंती न्यायालयाला केल्याचं उज्ज्वल निकमांनी सांगितलं. तसंच आरोपींची प्रॉपर्टी जप्त करण्याची मागणी देखील न्यायासमोर केल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले आहेत. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि वाल्मिक कराडच्या वकिलांनी बीड कोर्टात युक्तिवाद करत आपआपली बाजू मांडली. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी ही 10 एप्रिल होणार असून न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.