विदर्भाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतच मतभेद

शिवसेना ठाकरे पक्षाच्या सचिन अहिर यांनीही वडेट्टीवारांना जुन्या भूमिकेची आठवण करून दिली. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 13, 2025, 10:24 PM IST
विदर्भाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतच मतभेद

ब्युरो रिपोर्ट झी २४ तास : वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला...त्याला खासदार संजय राऊतांनी जोरदार विरोध तर केलाच...शिवाय वडेट्टीवारांनाही खडेबोल सुनावले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला मोठा इतिहास आहे. मात्र आता वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीतच मतभेद असल्याचं समोर आलं आहे. विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कुणी काहीही केलं तरी विदर्भ वेगळा होणार नसल्याचं सांगत राऊतांनी वडेट्टीवारांना खडसावलं आहे. तर आपण संजय राऊतांना महत्त्व देत नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्षाच्या सचिन अहिर यांनीही वडेट्टीवारांना जुन्या भूमिकेची आठवण करून दिली. वडेट्टीवार शिवसेनेत असतानाची शिवसेनेची भूमिका काय होती याचा त्यांना विसर पडला का, असं अहिर यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनं मत मांडलं होतं. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची आता यावरून काहीशी अडचण झालीय...बाळासाहेब ठाकरेंची जी भूमिका होती तीच आमची असल्याचं मंत्री शंभुराज देसाईंनी म्हटलंय...तर वेगळ्या विदर्भाचे फायदे-तोटे काय आहेत हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

 वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलं आहे. मात्र यावेळी मविआतच या मुद्यावरून मतभेद असल्याचं उघड झालं.काँग्रेसच्या वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेला शिवसेना ठाकरे पक्षानं जोरदार विरोध केला आहे. यावरून आता मविआत खटके उडण्याची शक्यता आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More