'जर तुम्ही राजीनामा दिला नाही, तर मी...', फडणवीसांचा इशारा आणि मुंडेंची माघार; समजून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Dhananjay Munde Resignation: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राज्यपालांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारला आहे. 

शिवराज यादव | Updated: Mar 4, 2025, 07:11 PM IST
'जर तुम्ही राजीनामा दिला नाही, तर मी...', फडणवीसांचा इशारा आणि मुंडेंची माघार; समजून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Dhananjay Munde Resignation: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष केलं जात होतं. वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. भाजपा आमदार सुरेस धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर यावरुन रान पेटवलं होतं. यानंतर आझ अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. राज्यपालांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्विकारला आहे. दरम्यान या राजीनाम्याचा घटनाक्रम कसा होता हे समजून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. त्यांनी यासंदर्भात अजित पवारांशी चर्चाही केली होती. पण धनंजय  मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. अखेरीस देवेंद्र फडणवीस यांनी जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल अशी भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या या इशार्‍यानंतर वातावरण बदललं.

दरम्यान रविवारी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. प्रारंभीपासूनच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती, अशी सूत्रांची माहिती आहे.

असा होता मुंडेंच्या राजीनाम्याचा घटनाक्रम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी आग्रही होते.

- यापूर्वी 3 ते 4 वेळा अजितदादांशी त्यांनी चर्चा केली होती.

- स्वत: धनंजय मुंडे यांनाही समजावून सांगितले होते. पण, धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते.

- शेवटी एका क्षणी देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका घेतली की, जर तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल. या इशार्‍यानंतर वातावरण बदलले.

- काल पुन्हा धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला. प्रारंभीपासूनच या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी अतिशय कडक आणि ठोस भूमिका घेतली होती, अशी सूत्रांची माहिती आहे.

- म्हणूनच एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. 

 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More