कार्यालयावर धाड पडल्यानंतर शहाजी बापू पाटीलांची पहिली प्रतिक्रिया, 'राजकारण सोडून देण्याचा...'

Shahaji Bapu Patil: सांगोल्यात शहाजीबापू पाटलांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यलयात दाखल झाले. 

प्रविण दाभोळकर | Updated: Dec 1, 2025, 12:13 PM IST
कार्यालयावर धाड पडल्यानंतर शहाजी बापू पाटीलांची पहिली प्रतिक्रिया, 'राजकारण सोडून देण्याचा...'
शहाजी बापू पाटील

Shahaji Bapu Patil: शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर रात्री छापा पडला.  सांगोला शहरातील कार्यालयावर हा छापा टाकण्यात आला. यावेळी निवडणूक भरारी पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली. छापा पडल्यानंतर शहाजी बापूंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले शहाजी बापू? जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

काय आहे नेमकं प्रकरण?

सांगोल्यात शहाजीबापू पाटलांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यलयात दाखल झाले. कार्यालयात व्हिडीओ रेकॉर्डिंग करीत तपासणी सुरु करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत ऑफिसची तपासणी सुरू होती. ऑफिसमध्ये बसलेल्या सर्वांनाच पोलिसांनी थांबवून घेतले होते. काल सांगोला मधील कार्यालयात पडलेल्या धाडी नंतर माजी आमदार शहाजी पाटील उद्विग्न राजकारणातून बाजूला होण्याचा मनात विचार आला आहे.

काय म्हणाले शहाजी बापू पाटील? 

'हे सगळं चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे.राजकारण सोडून देण्याचा विचार आज मनात येत आहे. वरिष्ठ नेत्यांशी बोलून मी आता थांबण्याचा विचार करत आहेय. अशा राजकारणाची पद्धत कधी सांगोल्यात झाली नाही', असे शहाजी बापू म्हणाले आहेत. 'मी अनेक निवडणुका लढवल्या पण अशी कारवाई कधी झाली नाही.सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळ पहावं.या धाडी मागे सांगोला मधील माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पालकमंत्री आहेत. जय कुमार गोरे यांच्या हाताला धरून त्याने हे काम केल्याचा', आरोप त्यांनी केलाय.

दानवेंची टीका 

शिवसेना (युबीटी) नेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करून शहाजी बापू पाटील यांच्यावर टीका केली. गुवाहाटीला जाताना 'झाडी डोंगर हॉटेल' गोड लागले. आता भाजप विरुद्ध ब्र शब्द उच्चरला की छाप्याची मालिका सुरू झाली. खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतो आहे. 'ओके मध्ये आहे', असं म्हणावंच लागेल आता बापू! , अशा शब्दात दानवेंनी टीका केली. 

आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे आरोप

शेकाप आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनीदेखील यावरुन टीका केली. धाड सत्र फक्त माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर पडली नाही.
सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयावर सुद्धा धाड पडली, बापू त्याचे भांडवल करत असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला. बंधू डॉ अनिकेत देशमुख यांना फितवण्याचा ते प्रयत्न प्रयत्न करत आहेत.  आमचे घर शहाजी बापू भांडण लावून वेगळं करत असल्याची टीका त्यांनी केली. 

FAQ 

१. प्रश्न: शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा का पडला आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली?

उत्तर: सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक भरारी पथकाने रात्री उशिरा शहाजीबापूंच्या सांगोला शहरातील कार्यालयावर छापा टाकला. ऑफिसची झाडाझडती घेऊन व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं. यानंतर शहाजीबापू उद्विग्न झाले आणि म्हणाले, “हे सगळं चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे. मी अनेक निवडणुका लढलो पण अशी कारवाई कधी झाली नाही. आता राजकारण सोडून देण्याचा आणि थांबण्याचा गंभीर विचार करतोय. वरिष्ठ नेत्यांशी बोलून निर्णय घेईन.”

२. प्रश्न: छाप्यामागे कोणाचा हात असल्याचा आरोप शहाजीबापूंनी केला?

उत्तर: शहाजीबापूंनी थेट आरोप केला की, “या छाप्यामागे सांगोल्याचे माजी आमदार तथा पालकमंत्री दीपक साळुंखे आणि जयकुमार गोरे यांचा हात आहे. साळुंखेंनी गोऱ्यांच्या हाताला धरून हे सगळं करवून घेतलंय.” त्यांनी सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेला हे सगळं पाहण्याचं आवाहन केलं.

३. प्रश्न: या छाप्यावर शिवसेना (UBT) आणि शेकाप नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे?

उत्तर:  शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी ट्वीटमध्ये खोचक टीका केली: “गुवाहाटीला जाताना झाडी-डोंगर हॉटेल गोड लागलं. आता भाजपविरोधात बोललात की छाप्यांची मालिका! खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय. ‘ओके मध्ये आहे’ म्हणावंच लागेल आता बापू!”  
शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले: “छापा फक्त शहाजीबापूंच्या ऑफिसवर नाही, सांगोला शहर विकास आघाडीच्या ऑफिसवरही पडला. पण बापू त्याचं भांडवल करतायत. त्यांनी स्वर्गीय गणपतराव देशमुखांचं घर फोडण्याचा आणि माझे बंधू डॉ. अनिकेत देशमुख यांना फितवण्याचा प्रयत्न केला.”

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More