Sharad Pawar interacts with Jay Pawar and Parth Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने पक्षासमोर अनेक प्रश्न उपस्थित राहिले असून, अजित पवारांच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी राजकीय असून आता ती भरुन काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, पार्थ किंवा जय पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे. सुनेत्रा पवार यांच्यासह दोन्ही मुलांच्या खांद्यावर अचानक मोठी राजकीय जबाबदारी आली असून, हे धनुष्यबाण आता पेलावं लागणार आहे.
पुढील राजकीय वाटचालीत सुनेत्रा पवारांसह, जय आणि पार्थ पवार यांना शरद पवारांच्या मार्गदर्शनाची मोठी गरज भासणार आहे. शरद पवारही त्यासाठी मतभेद विसरुन मदत करताना दिसत आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत असंच काहीसं चित्र दिसलं आहे. बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीत पार्थ आणि जय पवार पहिल्यांदाच सहभागी झाले होते. यावेळी शरद पवारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीदरम्यान आजोबा शरद पवारांनी नातू पार्थ आणि जय पवार यांनी संस्थेच्या कामकाजाचे धडे दिल्याचं समजत आहे. संस्थेचं कामकाज नेमकं कसं चालतं? अजित पवारांची भूमिका नेमकी कशी होती? विद्या प्रतिष्ठानमधील अजित पवारांचं काम तुम्हाला पुढे कसं नेता येईल? संस्थेच्या कामकाजासंबंधी पार्थ आणि जय यांना इतर विश्वस्तांकडून सविस्तर माहिती देण्यात आली.
विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीत पार्थ आणि जय पहिल्यांदाच सहभागी झाले होते. मात्र संस्थेत अजित पवारांची जागा कोण घेणार? याबाबत माञ अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, शरद पवार, जय पवार, नीता पाटील, विजया पाटील, श्रीनिवास पवार, रोहित, राजेंद्र, रणजित पवार असे सर्वजण उपस्थित होते आणि सर्वांच्या भेटी घेतल्या. शरद पवारही तिथे पोहोचले होते. यावेळी तेदेखील खुर्चीत बसून पवार कुटुंबासह शोकसभेसाठी आलेल्या सर्वांची भेट घेताना दिसले. शोकसभेच्या निमित्ताने शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आले होते. दरम्यान यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली हे समोर आलेलं नाही.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
WI
|
VS |
AFG
|
| Afghanistan beat West Indies by 23 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
|
VS |
SCO
|
| Namibia beat Scotland by 6 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
|
VS |
NEP
|
| Nepal beat United Arab Emirates by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.