बेळगावात जाण्याची वेळ येणार नाही, शरद पवारांच्या अल्टीमेटमला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर!

शरद पवारांच्या अल्टीमेटमवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले....

Updated: Dec 6, 2022, 07:39 PM IST
बेळगावात जाण्याची वेळ येणार नाही, शरद पवारांच्या अल्टीमेटमला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर!

Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Dispute) निर्णायक वळणावर पोहचला आहे. या वादाला हिंसक वळण लागल्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या वादात उडी घेत थेट सरकारालाच अल्टीमेटम देत स्वत: बेळगावात जाणार असल्याचे म्हंटले आहे. राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारची भूमिका मांडली.  शरद पवारांना बेगळावात जाण्याची गरज पडणार नाही असे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी त्यांच्या 48 तासांच्या अल्टीमेटमला प्रत्युत्तर दिले आहे. (Devendra fadnavis on Sharad Pawar Ultimatum latest Marathi News)

सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन कर्नाटक मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. शरद पवार (Sharad Pawar) यांना बेळगामध्ये जाण्याची गरज पडणार नाही,  हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कानावर घालणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

आपल्या संविधानाने प्रत्येकाला कोणत्याही राज्यामध्ये जाण्याचा अधिकार दिला आहे. एखाद्या राज्यात याची पायमल्ली होत असेल तर त्या राज्य सरकारने रोखलं पाहिजे. जर असं लक्षात आलं की हे राज्य सरकार रोखत नाही तर निश्चित हे केंद्रापर्यंत न्यावं लागेल. महाराष्ट्र हा न्यायप्रियतेसाठी ओळखला जातो त्यामुळे कोणी काही करत असेल तर पोलीस त्यांनी रोखतील, असं फडणवीसांनी सांगितलं. 

शरद पवार यांनी दिलेला अल्टिमेटम-

बेळगावातील कन्नडिगांच्या राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय... पुढच्या 48 तासांमध्ये हे सर्व थांबलं नाही तर आपण स्वत: बेळगावात जाणार असल्याचं अल्टिमेटम पवारांनी कर्नाटक सरकारला दिलंय. तसंच पुढे जे काही होईत त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील असंही त्यांनी बजावलंय.  बोम्मईंच्या चिथावणीखोर भाषेमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही पवारांनी केलाय. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना फोनवरून संपर्क साधला, पण उपयोग झाला नाही, असं सांगतानाच केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याची टाकी त्यांनी केली.