कणकवली नगरपालिकेत शिंदे-ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. राजन तेली यांनीही याबाबत दुजोरा दिल्याची माहिती आहे. त्यावरून नारायण राणेंनी थेट एकनाथ शिंदेंना इशारा दिलाय. तसं झालं तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीत शिवसेनेशी युती तोडण्याचा इशाराच राणेंनी दिलाय.
नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीसाठी नवं समीकरण जुळून येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील भाजपचे आणि त्यातही राणे कुटुंबाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी आता शिवसेना आणि शिवसेना UBTने एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जाण्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवलाय. लवकरच त्या अहवालावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. कणकवली नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोनही पक्षांनी पडद्यामागे हालचाली सुरू केल्या आहेत.बैठकीत माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सांवत या नेत्यांची बैठक पार पडली.
स्थानिक पातळीवरील या प्रस्वावारून नारायण राणेंनी नाराजी व्यक्त केलीये. जर असं काही झालं तर आम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात शिंदेंसोबतशी संबंध तोडण्याचा इशारा नारायण राणेंनी दिलाय. तर भाजपला रोखण्याचा प्रयत्न ना राज्यात ना सिंधुदुर्गात होईल असा विश्वास शिवसेनेच्या उदय सामंतांनी व्यक्त केलाय. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीतच लढण्याचा आमचा प्रयत्न असेल मात्र जर काही तिढा असेल तर त्यावर चर्चा करून मार्ग निघेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय.
शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेना आणि शिवसेना UBTहे दोन्ही पक्ष स्थानिक स्तरावर मतभेद विसरून एकत्र येण्याची चर्चा आहे.मात्र महायुतीतील मित्रपक्ष शिवसेनेनं हा निर्णय घेतल्यास भाजपही आक्रमक होण्याची शक्यता आहे. राणे कुटुंबाच्या वर्चस्वला सुरुंग लावण्यासाठी जर खरंच दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर कोकणतील राजकीय समीकरणं खूप बदलून राज्याच्या राजकारणातही खळबळ उडेल.
नारायण राणेंनी काय इशारा दिला आहे?
नारायण राणेंनी एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे की, जर शिंदे-ठाकरे एकत्र आले तर सिंधुदुर्ग-रत्नागिरीत शिवसेनेशी युती तोडण्याचा इशाराच राणेंनी दिलाय.
कणकवली नगरपालिकेत शिंदे-ठाकरे एकत्र येणार आहेत का?
होय, कणकवली नगरपालिकेत शिंदे-ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे.
शिवसेनेच्या उदय सामंतांनी काय सांगितले आहे?
शिवसेनेच्या उदय सामंतांनी सांगितले आहे की, भाजपला रोखण्याचा प्रयत्न ना राज्यात ना सिंधुदुर्गात होईल.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.