Sai Baba of Shirdi Get Gold Gift : शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी दानाचा ओघ सुरूच आहे. साईचरणी नवरत्न जडीत हार अर्पण करण्यात आला आहे. साईबाबांना मिळालेली ही आणखी एक मौल्यवान भेट मानली जात आहे. नवरत्न आणि सोन्याची घडणावळ असलेल्या या हाराची किंमत तब्बल 20 लाख रुपये इतकी आहे.
हैदराबाद येथील साईभक्त भूपाल कामेपल्ली आणि राजलक्ष्मी कामेपल्ली यांनी साई चरणी हा हार दान म्हणून अर्पण केला आहे. 310 ग्रॅम वजनाच्या या हाराची किंमत तब्बल 20 लाख रुपये आहे. नवरत्न जडीत हा सुवर्णहार हा अत्यंत मौल्यवान दागिना आहे.
विशेष म्हणजे हा हार राजलक्ष्मी यांनी स्वतःच्या हाताने बनवला आहे. त्याचप्रमाणे 1176 ग्रॅम वजनाचे 31 हजार रुपये किंमतीचे चांदीचे ताट, वाटी, प्लेट, ग्लास तर दोन लाख रुपये देणगीचा धनादेश देखील कामेपल्ली कुटुंबियांनी साई संस्थानला देणगी स्वरूपात दिला आहे..
तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील साईभक्त नागम अलिवेणी यांनी 12 लाखांचे सुवर्णफुल साई चरणी अर्पण केले होते. नागम यांनी पतीच्या स्मरणार्थ हे फुल फुल साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले आहे. 233 ग्रॅम वजनाचे हे सुवर्ण फुल १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे आहे.
गेल्या वर्षी 2022 मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशीच शिर्डीतील (Shirdi Sai Baba)साईबाबांच्या चरणी एका भाविकाने सोन्याचा मुकुट (Gold Crown)अर्पण केला होता. अन्नम सतीश प्रभाकर नावाच्या साई भक्ताने 36 लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट आणि 33 हजारांचे चांदीचे ताट (Silver Plate)अर्पण केले. 770 ग्राम वजनाचा सोन्याचा मुकुट आणि 620 ग्राम वजनाचे चांदीचे ताट आहे.
आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी आणि शिर्डीतील साईबाबा संस्थान ही देशातील श्रीमंत देवस्थाने म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्र, आंध्र, गुजरात यासह अनेक राज्यांतून दररोज हजारो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येत असतात. वर्षागणिक साई संस्थानाला मिळत असलेल्या देणग्या या कोट्यवधींच्या घरात आहे.