गुजरातची गरिबी लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की, `सामाना`तून टीकास्त्र
गुजरातची गरिबी लपवण्यासाठी मोदी सरकारवर भिंती उभारण्याची नामुष्की आल्याची बोचरी टीका
मुंबई : गुजरातची गरिबी लपवण्यासाठी मोदी सरकारवर भिंती उभारण्याची नामुष्की आल्याची बोचरी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. तसेच अमेरिकेत झालेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात मोदींवर स्तुतीसुमने उधळण्यात आली. आता याची पुनरावृत्ती 'केम छो ट्रम्प' या कार्यक्रमातून त्याची फिट्टमफाट केली जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच ट्रम्प यांना दिल्लीत न उतरवता अहमदाबाद नेण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अमेरिकेतील गुजराती व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची टीका देखील करण्यात आली आहे.
अहमदाबाद येथील झोपडपट्ट्या लपवण्यासाठी भिंती उभारण्याचे काम सुरु आहे. भारतातील गरिबी दिसू न देण्याचा केवीलवाणा प्रयत्न असल्याची टीका यात सामनातून करण्यात आली. ट्रम्प यांचा अहमादाबाद दौरा आटोपल्यानंतर झोपडपट्या लपवणाऱ्या भिंती पाडणार का ? असा प्रश्न सामनातून विचारण्यात आला आहे.
काँग्रेसच्या 'गरिबी हटाव' घोषणेवर मोदी सरकारने टीका केली होती. आता भिंती बांधण्याच्या प्रकारामुळे 'गरिबी छुपाव'चा प्रयत्न झाल्याचे म्हटले आहे. आता नव्या अर्थसंकल्पात स्वतंत्र आर्थिक तरदूत केली आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला आहे.