'हे नोटचोरीचं सरकार आहे,' पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी आदित्य ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray on Parth Pawar: पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 7, 2025, 04:41 PM IST
'हे नोटचोरीचं सरकार आहे,' पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी आदित्य ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray on Parth Pawar: पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. एखाद्या रजिस्टारला किंवा डेप्युटी रजिस्टरला निलंबित करून विषय संपतो का? यामध्ये अनेक मोठी नावं येत आहेत, त्यात चौकशी किंवा कारवाई होणार का? अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. अनेक घोटाळे समोर आल्यानंतर त्यांना पाठवण्यासाठी मागे आणून ठेवलं असं आहे का? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

काल मुख्यमंत्र्यांनी कागदपत्र वगैरे मागवतो असं सांगितलं. परंतु यामध्ये नक्की काय आहे त्यांनी स्पष्ट बोलावं. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे, तसंच ज्यांची खाती या प्रकरणात येतात त्यांनादेखील विचारलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. कितीतरी मंत्र्यांचे डान्सबार आहेत, बॅग नोटांनी भरलेले मंत्री आहेत, हे नोट चोरीचं आणि वोट चोरीचं सरकार आहे," अशी टीकाही त्यांनी केली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना फुकटच हवं आहे. शेतकरी काय अजित पवारांचा पोरगा नाही, सगळं फुकट मिळायला असा टोलाही त्यांनी लगावला. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनीही पार्थ पवारांवरदेखील गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी केली आहे. तसंच पार्थ पवार चुकीचे असले तर अजितदादा तुम्ही मध्ये येऊ नका असंही म्हटलं आहे. सरकारला जमीनच विकायची होती तर त्याची निविदा का काढली गेली नाही? असा प्रश्न उपस्थित करत पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी राजू शेट्टी यांनी अनेक सवाल देखील उपस्थित केले आहेत.

पार्थ पवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

पार्थ पवार यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी अनेक संघटना मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. तक्रारी अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी पुरावे देण्यात आले आहेत. 

माझा काही संबंध नाही - अजित पवार

"माझा या गोष्टीशी दुरान्वये संबंध नाही हे मी कालच मराठीत सांगितलं आहे. आज सकाळापासून आमच्या आढावा बैठका आहेत ज्या 6 ते 7 वाजेपर्यंत सुरु असतील. त्यानंतर मी सांगणार आहे. इतर सर्व गोष्टी नियमाप्रमाणे करण्यास सांगितल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. चौकशी होत असून त्यातून सत्य बाहेर येईल. सत्य समोर आल्यानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल," असं अजित पवारांनी झी 24 तासशी संवाद साधताना सांगितलं. 

तुम्हाला याची कल्पना होती का? असं विचारलं असता अजित पवारांनी नकार दिला. "नाही, अजिबात नाही. मी नेहमी माझ्या लोकांना कोणतीही गोष्ट करताना कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीत राहूनच करावी असं सांगतो". तुम्ही हे प्रकरण काढलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं. 

दरम्यान पार्थ पवारांशी खासगीत कोणतंही बोलणं झालं नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.  स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने त्यात मी व्यापलो आहे असं कारण त्यांनी दिलं.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More