जळगाव : शिवसेना-भाजप युती होवो ना होवो, शिवसेनेच्या उमेदवारांची यादी तयार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्रास देणाऱ्यांना शिवसैनिकांचा विरोधच असेल, असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा युतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच त्यांनी अप्रत्यक्ष नारायण राणे प्रकरणी भाजपला टोला लगावला आहे. राणेंना शिवसेनेचा विरोध आहे. दरम्यान, भाजपकडून राणेंचा होणारा प्रवेश लांबवणीवर पडत आहे. तर दुसरीकडे राणे यांनी माझा भाजपमध्ये प्रवेश होणार असेच सांगत आहेत. त्यामुळे युतीत अंतर पडण्याची चर्चा वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, युती झाली किंवा नाही झाली तरी सेनेच्या उमेदवारांची यादी तयार आहे. तो शिवसेनेचा प्रारंध असेल तर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होणार, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
- बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना शिवसैनिकांचा विरोधच
-प्रारब्ध असेल तर आदित्य मुख्यमंत्री होणार
- परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो
- खान्देशातील सिंचनाची कामं रखडल्याची कबुली
- एकनाथ खडसे आता लालकृष्ण अडवाणींच्या भूमिकेत