Sanjay Jadhav alleged 50 Guns Brought in City: निवडणुकीच्या तोंडावर शहरात 50 कट्टे आले आहेत असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आपण कोणत्याही पक्षावर आरोप करत नसल्याचं स्पष्ट केलं. काही ठिकाणी तर आधार कार्ड गोळा करून त्यावरील फोटो बदलून बोगस आधार कार्ड तयार करण्याचे काम सुरू आहे असाही दावा त्यांनी केला आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकरांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी यांच्या धमक्यांना कोण घाबरणार? असा सवाल केला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर शहरात 50 कट्टे आले आहेत. हे कट्टे म्हणजे गावठी बंदुका आल्या आहेत. मी याबाबत पोलीस अधीक्षकांना सूचना केलेल्या आहेत. या निवडणुकीत बंदुकाचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस यंत्रणांनी गृहमंत्र्यांनी याबद्दल अलर्ट राहावं. मी जर एवढ्या उजागर बोलत असेल तर यातील गांभीर्य समजून घ्यावं असंही ते म्हणाले आहेत.
"कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये म्हणून मी लोकप्रतिनिधींच्या नात्याने बोलत आहे. मी कोणत्याही पक्षावर आरोप करीत नाही आहे. काही ठिकाणी तर आधार कार्ड गोळा करून त्यावरील फोटो बदलून बोगस आधार कार्ड तयार करण्याचे काम सुरू आहे. बोगस वोटिंगसाठी याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे," असं आवाहन त्यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, "महानगर पालिकेच्या आयुक्तांनी जेवणाचे जे टेंडर दिलेत ते एवढ्या स्वस्त दरात दिले आहेत की हा कायदा संपूर्ण देशात लागू करावा. 10 पैशात मनपा आयुक्त आलूवडा, 10 पैशात चहा देणार आहेत. याची कसून चौकशी झाली पाहिजे. यामागचं गुपित समोर यायला हवं," असा गंभीर आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे.
पालकमंत्री बोर्डीकर यांच्या वक्तव्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, केंद्रात आणि राज्यात आमचा गृहमंत्री आहेत म्हटल्यावर आमच्याशी कोण पंगा घेणार असं वाटत असेल. पण यांच्या धमक्यांना कोण घाबरणार? आमचा धमक्या द्यायचा स्वभाव नाही. अंगावर आल्यावर शिंगावर घ्यायचं हा आमचा स्वभाव आहे. आम्ही कोणाला धमक्या गिमक्या देत नाही. तुमच्या सरकारवरून काय घेणं देणं इथं आमचं सरकार आहे. तुमचं केंद्रात असलं राज्यात असलं परभणीत सरकार आमचं आहे".
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
ENG
(97.3 ov) 384 (88.2 ov) 342
|
VS |
AUS
567(133.5 ov) 161/5(31.2 ov)
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(45.2 ov) 152 (34.3 ov) 132
|
VS |
ENG
110(29.5 ov) 178/6(32.2 ov)
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 231/5
|
VS |
SA
201/8(20 ov)
|
| India beat South Africa by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.