Sanjay Raut on Rajya Sabha Election: राज्यसभेवरुन सध्या महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचं दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेला राज्यसभेत आपला सदस्य असावं असं जास्त वाटत आहे असं म्हटलं आहे. मविआचा हा तीनतिघाडा आहे. पण कामबिघाडा नाही. काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होईल. तीन पक्ष बोलत आहेत. तिकडे तीन चाकी रिक्षा आहे. एकाच जागेवरून चर्चा सुरु आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.
"काँग्रेस पक्षात कोण इच्छुक आहे मला माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त शरद पवार इच्छुक आहेत. आमच्या पक्षातून प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत. काहींनी उद्धव ठाकरेंना भेटून इच्छा व्यक्त केली आहे, त्यात राजन विचारे आहेत. विनायक राऊत यांचं नाव ऐकलं आहे. निर्णय शेवटी पक्षप्रमुख घेणार आहेत. अर्ज भरण्याची तारीख येईल तेव्हा निर्णय घ्यावाच लागणार आहे," असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
पुढे ते म्हणाले, "आपण इंटरनेच्या युगात आहोत. झूमवरुन मीटिंग होत असतात, त्याच्यावर बोलणी सुरु असतात. यंत्रणा प्रगत झाली असून, प्रत्यक्ष भेटण्याची गरज नाही. काल जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली".
राज्यसभेवरील दावा आपला कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. "आमचा दावा आहे. प्रत्येकजण आपला दावा सांगत असतो. कारण प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त होत आहे. राज्यसभेत आपला सदस्य असावं असं प्रत्येकाला वाटतं. शिवसेनला जास्त वाटतं कारण शिवसेना आजही प्रादेशिक पक्ष आहे. किमान आमचे दोन प्रतिनिधी असावेत अशी पक्षप्रमुखांची भूमिका आहे".
"राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून, एकमेकांशी चर्चा सुरु आहे. तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. शरद पवार इच्छुक आहेत. महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेता जाईल. उद्धव ठाकरे काँग्रेसशी बोलत आहेत. जो निर्णय होईल तो एकमताने होईल," असं त्यांनी सांगितलं.
"शरद पवार कधीही एनडीएसोबत जाणार नाहीत. मला जे राजकारण कळतं आणि जितके वर्ष शरद पवारांना ओळखतो त्यावरुन हे सांगू शकतो. ते जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे आहेत. हे खात्रीने सांगतो. तसंच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची चिंता आणि शिवसेनेला संख्याबळ टिकवण्याची चिंता आहे. शिवसेनेचा आवाज कायम राहण्याची चिंता आहे. चर्चा सुरु असून, मी उत्तर देऊ शकणार नाही. तीन पक्षात मोठा पक्ष शिवसेना आहे, त्यामुळे आमची भूमिका महत्वाची आहे," असंही ते म्हणाले.
जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर ते म्हणाले की, "रोहित पवार एकट्याने लढत आहेत. अजित पवारांच्या पत्नी, मुलं त्यांनी यात सहभागी व्हायला हवं. जय पवार यांनी अशी माहिती समोर आणली असेल तर व्हीएसआर आणि डीजीसीएवर गुन्हा दाखल व्हायला हवा".
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More
LIVE|
BOT
60(19.3 ov)
|
VS |
LES
0/0(0 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 255/5
|
VS |
NZ
159(19 ov)
|
| India beat New Zealand by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 130/7
|
VS |
MAS
128(19.5 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 2 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.