Shivshahi Bus Accident: गोंदिया सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी डव्वा जवळ शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन 11 जण ठार झाले होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली होती. या चौकशी समितीने दहा दिवस सखोल चौकशी करुन आपला अंतिम चौकशी अहवाल परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे सादर केला आहे. शिवशाही अपघाताला चालकच जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील खजरी डव्वा जवळ 29 नोव्हेंबरला शिवशाही बसचा भीषण अपघात झाला होता. यात 11 लोकांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर महामंडळावर चौफेर टीका झाली. तसेच शिवशाही बसेसच्या फिटनेसवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता. तर प्रवाशांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने सुद्धा या अपघाताची गांभीर्याने दखल घेतली. शिवशाही बसच्या अपघातातील नेमकी कारणे काय आहेत, अपघातास नेमके कारणीभूत कोण, शिवशाही बसचे फिटनेस आदी सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी दोन चौकशी समिती गठित केल्या होत्या.
जिल्हास्तरावर गोंदियाचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम तिवसकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली होती. तर विभागीय स्तरावर नागपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती होती. गोंदिया येथील समितीने दोन दिवसांपूर्वीच आपला अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याकडे सादर केला. यानंतर चव्हाण यांनी दोन्ही चौकशी अहवाल एकत्रित करून त्याचा एकत्रित अहवाल परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्याकडे सादर केला आहे. या चौकशी अहवालात खजरी शिवशाही अपघातास चालकच कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच अपघातग्रस्त शिवशाही चालकाकडून यापूर्वी सुद्धा अपघात झाले असताना त्याला सेवेत कार्यरत कसे ठेवण्यात आले? यावर सुद्धा ताशेरे ओढण्यात आले आहे. त्यामुळे या चौकशी अहवालावरून चालकासह एसटी महामंडळाचे काही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चित मानली जात आहे.
प्रवीण तांडेकर ...Read More
LIVE|
NZ
205(75 ov)
|
VS |
WI
24/0(9 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.