)
Nagpur Crime News : फलटण डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. हे प्रकरण नुकतंच घडलेलं असताना नागपुरातून एक संतापजनक घटना समोर आळी आहे. सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन दोन नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला आहे.
नागपूर जवळच्या भिलगाव परिसरातील लॉजवर मुलीला अपहरण नेऊन दोन आरोपींनी अत्याचार केला आहे. एवढंच नव्हे तर - आरोपींनी अत्याचार करतानाचे व्हिडीओ देखील काढले. कुणाला सांगितल्यास व्हिडीओ व्हायरल आणि जीवे मारण्याची धमकी या दोन आरोपींनी दिली होती. नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी करण आणि रोहीत या दोन आरोपींना अटक केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून दोघांवर यापूर्वी अनेक गंभीर गु्न्ह्यांच्या नोंद आहे. ही घटना गुरुवारी घडली असून शुक्रवारी सायंकाळी पिडीतेच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पोलीसांनी आरोपी विरुद्ध बलात्कार आणि पोस्कोच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
10 तारखेला पुणे सोलापूर हायवेवर लिफ्ट मागत असताना गाडी थांबवून झाडीत नेवून बलात्कार केला होता. त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात तपासात करण्यात आला आणि अटक करण्यात आली. संशयित आरोपीची रेखाचित्र बनवण्यात आल. त्याला विचारपूस केली तेव्हा त्याने गुन्हा केल्याचं कबूल केल आहे. याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.
घटनाक्रम नेमका कधीचा?
मुलगी गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी एकटी नंदनवन मार्केटला फळे आणि भाज्या घेण्यास गेली होती. तेव्हा आरोपी करण रामटेके 22 वर्षे आणि रोहित सोनवणे यांनी तिला चाकूच्या धाक्यात पकडले आणि मोटारसायकलवर बसवून बिडगाव परिसरातील एका लॉजमध्ये नेले. तिथे करणने मुलीवर बलात्कार केला, तर रोहितने हा कृत्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीला घरी सोडताना आरोपींनी धमकी दिली की, ती बोलली तर व्हिडिओ व्हायरल करू.
मुलीची पार्श्वभूमी
ही मुलगी नंदनवन परिसरातील एका साध्या कुटुंबातील आहे. आरोपी करणने अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता आणि मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. शेजाऱ्यांनीही करणचा तिला त्रास देण्याचे प्रमाण पाहिले होते, पण मुलीने त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे चुपच बसली होती.
आरोपींची ओळख
करण रामटेके हा एक कुख्यात गुंड आहे, ज्याच्यावर चोरीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. रोहित सोनवणे हा त्याचा साथीदार असून, त्याने गुन्ह्यात मदत केली.
फरीदाबादमधील बल्लभगडमध्ये नातेसंबंध तुटवणारी एक घटना समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून एक कलियुगीन वडील आपल्याच १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होते, ही गोष्ट मुलगी आजारी पडल्यानंतर उघडकीस आली. पोलिसांनी ४२ वर्षीय कलियुगीन वडील, जो ऑटोरिक्षा चालक आहे, त्याला अटक केली आहे. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या प्रकरणाशी संबंधित तपासकर्त्यांनी सांगितले की, पीडित मुलगी ७ वी ची विद्यार्थिनी आहे. दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या रोजच्या भांडणांना आणि हिंसाचाराला कंटाळून, मुलीची आई तिच्या सहापैकी दोन मुलांना सोबत घेऊन चरखी दादरी येथील तिच्या बहिणीच्या घरी गेली होती. मुलगी तिच्या वडिलांसोबत तिच्या लहान भावंडांसह राहत होती.