'तो भररस्त्यात...' अडीच वर्षाच्या चिमुकलीवर 80 वर्षांच्या म्हाताऱ्याचा लैंगिक अत्याचार

अतिशय संतापजनक आणि हादरवून टाकणारी बातमी धुळ्यातून समोर आली आहे. एका 80 वर्षांच्या वृद्धाला अडीच वर्षांच्या चिमुकलीची लैंगिक छेडछाड केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 4, 2025, 07:44 PM IST
'तो भररस्त्यात...' अडीच वर्षाच्या चिमुकलीवर 80 वर्षांच्या म्हाताऱ्याचा लैंगिक अत्याचार

 धुळे शहरातील विश्वकर्मा नगर परिसरात एका अडीच वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक छेडछाड केल्याच्या संशयावरून एका 80 वर्षीय वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घडलेल्या या संतापजनक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विश्वकर्मा नगरमध्ये एक वृद्ध व्यक्ती लहान मुलीची छेडछाड करत असल्याची तक्रार 112 या हेल्पलाइन क्रमांकावर प्राप्त झाली होती. 

माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच परिसरातील नागरिकांनी त्या चिमुकलीची सुटका करून संशयित वृद्धाला पकडून ठेवले होते. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयिताला ताब्यात घेतले असून, या प्रकरणी लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More