धक्कादायक! पोलिसांनी वसतीगृहात घुसून तरूणींना कपडे काढून नाचवलं

महाराष्ट्राला हादरवणारी घटना 

Updated: Mar 3, 2021, 12:12 PM IST
धक्कादायक! पोलिसांनी वसतीगृहात घुसून तरूणींना कपडे काढून नाचवलं

जळगाव : महाराष्ट्रातील जळगावमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या वसतीगृहातील महिला आणि मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वसतीगृहातील या महिलांना आणि मुलींना कपडे काढून नाचवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये पोलिसांचा देखील समावेश असल्याचं समोर आलं आहे.

शासनाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाचे मार्फत निराधार आणि अत्याचार ग्रस्त महिलांच्या मुलींच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते.  जळगावच्या आशादीप वस्ती गृहातील महिला आणि मुलींना  पोलिसांनी आणि अज्ञात व्यक्तींनी पैसे काढून नाचविण्यात आल्याची तक्रार या महिलांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेच्या संदर्भात महिलांनी वसतीगृहाच्या खिडकीतून बोलतांना आपल्यावर अन्याय अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे.  रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करीत असल्याचं महिलांनी म्हटलं आहे. 

या संदर्भात इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या  मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांच्याकडे साहिल पठाण यांना एक व्हिडिओ दाखवला आहे. या व्हिडिओतून सगळी घटना स्पष्ट होत आहे. त्यानंतर मंगला सोनावणे आणि फिरोज पिंजारी यांनी  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आता दिला आहे. 

'या घटनेचा संदर्भात आपल्याकडे काही जणांनी निवेदन दिले आहे. या निवेदनातील आरोपांची गंभीर  दखल घेतली असून त्या संदर्भात आपण चौकशी समिती गठीत केली आहे. ही चौकशी समिती संपूर्ण घटनेचा तपासकरून जो अहवाल देईल  त्यानुसार  जर त्यात काही तथ्य आढळून आले तर कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.