धक्कादायक बातमी! कोल्हापुरच्या ज्योतिबा डोंगरावरील प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा

Jyotiba Mandir Prasad : कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यात चक्क ब्लेडचा तुटलेला तुकडा आठळून आला आहे.

पूजा पवार | Updated: Jan 21, 2025, 01:52 PM IST
धक्कादायक बातमी! कोल्हापुरच्या ज्योतिबा डोंगरावरील प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा
(Photo Credit : Social Media)

कोल्हापूर : देवस्थानच्या ठिकाणी आपण खात असणारा प्रसाद सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यात चक्क ब्लेडचा तुटलेला तुकडा आठळून आला आहे. त्यामुळे देवस्थानच्या ठिकाणी मिळत असणारा प्रसाद नक्की सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.  यापूर्वी देखील ज्योतिबा मंदिर परिसरात तब्बल दोन टन भेसळयुक्त खवा आणि पेढा आढळून आला होता, या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली, पण त्याचे पुढे काय झालं याबाबत मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने कोणतीच माहिती दिली नसल्याच तक्रारदाराने म्हटले आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादा मध्ये ब्लेड : 

कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावरील प्रसादात आढळलेलं ब्लेडचा तुटलेला तुकडा हे ज्योतिबा डोंगरावरील शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादा मध्ये आढळलं आहे. संबंधित दुकानदारासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे. प्रसादात ब्लेड आढळल्याने भाविकांमध्ये घाबराहटीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

हेही वाचा : पुण्यात आढळून आले रहस्यमयी आजाराचे 22 रुग्ण! यंत्रणेला खडबडून जाग; आता महापालिकेने...

 

चार दिवस ज्योतिबा मंदिर बंद :  

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूर्तीची उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरू होणार. 21 ते 24 जानेवारी दरम्यान चार दिवस ही संवर्धन प्रकिया चालणार आहे. ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्योतिबाची मुख्य मूर्ती प्राचीन दगडापासून बनलेली आहे. या मूर्तीवर वर्षानुवर्ष होत असलेल्या अभिषेकामुळे मूर्तीची झीज झाली आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला संपर्क करून मूर्तीची पाहणी करण्याची विनंती केली होती. या पाहणीनंतर पुरातत्व विभागाने मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया गरजेचे असल्याचे नमूद केला होत, त्यानुसार उद्यापासून ही संवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे, यादरम्यान भक्तांसाठी ज्योतिबाची उत्सव मूर्ती मंदिरातील कासव चौकात ठेवली जाणार आहे. 

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More