मंगळदोष, शरीर संबंधांसाठी बळजबरी आणि...; मुंबईतील हुंडाबळींच्या घटनांचा आकडा वाढला

Dowry Cases In Mumbai: आजकाल हुंडा दिला किंवा घेतला जात नाही, असं वाटत असलं तरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आजही हुंड्याची मागणी केली जाते. त्यासाठी विवाहित महिलांचा छळही केला जातो हीच वस्तुस्थिती.   

Updated: Oct 13, 2025, 10:54 AM IST
मंगळदोष, शरीर संबंधांसाठी बळजबरी आणि...; मुंबईतील हुंडाबळींच्या घटनांचा आकडा वाढला
(photo credit - Social Media)

Dowry Cases: गावखेड्यातच नाही तर मुंबईसारख्या प्रगत शहरातसुद्धा हुंडाबळीच्या घटनांचे आकडे थक्क करणारे आहेत. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतही अनेक घरांमध्ये हुंड्यासाठी महिलांचा वेगवेगळ्या प्रकारे छळ केला जातो. चारित्र्यावर संशय घेणे, शरीर संबंधांसाठी जबरदस्ती, मंगळदोष त्यामुळं होणारा छळ अशी एक ना अनेक कारणे सांगत मुंबईतील कैक विवाहितांचा छळ होत असून, यामागे अनेक कारणं असली तरीही मुख्य उद्देश फक्त हुंडाच असल्याचे मुंबईतील घटनांमधून समोर आले आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईत चालू वर्षात हुंड्यासाठी छळाचे 300 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. झोपड्यांमध्येच नाही तर उच्चभ्रू इमारतींमध्येही हुंड्यासाठी महिलांना छळले जात आहे, हे अनेक घटनांवरून दिसून आले आहे.  

मुंबईतील गुन्ह्याची आकडेवारी खालीलप्रमाणे 
2023 मध्ये  हुंड्यासाठी केल्या जाणाऱ्या छळाचे एकूण 766 गुन्हे दाखल झाले, तर 2024 मध्ये ही संख्या 458 होती. एवढेच नाही तर चालू वर्षीतील सासुरवाडीच्या जाचाला बळी गेल्या महिलांची संख्या 314 आहे. ही नोंद झालेल्या गुन्ह्याची आकडेवरी आहे, पण ज्या घटना नोदल्या गेल्याच नाही त्यांचं काय? 

हुंडाबळी कायदा 
हुंडाबळी कायदा असला तरी गुन्ह्यावर आळा घालणे आजूनही शक्य झालेले नाही. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष वस्तू , स्थावर, जंगम मालमत्ता देणे अगर देण्याचे कबूल करणे. पैसे, दागिने, करार, जमीन, सोनं कुठल्याही स्वरूपात देवाण-घेवाण. 498-अ अंतर्गत 7 वर्षांच्या आत कोणत्याही कारणासाठी विवाहित महिलेची आत्महत्या झाल्यास तो दखलपत्र गुन्हा ठरू शकतो.

हुंडाबळी हा समाजाला मोठा कलंक 
हुंडाबळीच्या काही घटना आशा आहेत की ज्यात कैक नावं  सहभागी आसतात असं अहनाल सांगतो आणि त्याचच एक उदाहरण म्हणजे पुण्यातील  वैष्णवी हगवणेचे आत्महत्या प्रकरण. 

वैष्णवी हगवणेने शुक्रवारी (16 मे 2025) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.

FAQ

  • मुंबईतील हुंडाबळीच्या घटनांची आकडेवारी काय आहे? 
    2023 मध्ये 766, तर 2024 मध्ये 458 हुंड्यासाठी छळाचे गुन्हे दाखल झाले. 2025 मध्ये 314 महिलांचा सासुरवाडीच्या जाचाला बळी पडल्याची नोंद आहे.
     
  • हुंडाबळीच्या घटना केवळ झोपडपट्ट्यांमध्येच घडतात का?
    नाही, मुंबईतील झोपडपट्ट्यांपासून उच्चभ्रू इमारतींपर्यंत सर्वत्र हुंड्यासाठी छळाच्या घटना घडतात.
     
  • वैष्णवी हगवणे प्रकरण काय आहे?
    वैष्णवी हगवणेने 16 मे 2025 रोजी पुण्यात आत्महत्या केली. तिच्या लग्नात 51 तोळे सोने, गाडी, चांदीची भांडी देऊनही तिला सासरच्या लोकांनी चारित्र्यावरून आणि हुंड्यासाठी शारीरिक-मानसिक छळ केला.
About the Author