महाराष्ट्राच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार; ईव्हीएम मशिन फोडल्या आणि...

महाराष्ट्राच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशिन फोडल्याचे समोर आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 2, 2025, 08:41 PM IST
महाराष्ट्राच्या निवडणुकीत धक्कादायक प्रकार; ईव्हीएम मशिन फोडल्या आणि...

Maharashtra Nagar Parishad Election 2025 : राज्यातील नगरपरिषदा आणि  नगरपंचायतीच्या निवडणुकासांठी मतदान पार पडले. निवडणुकीत धक्कादायक प्रकार घडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ईव्हीएम मशिन फोडल्या आहेत. ज्या केंद्रावर या मशीन फोडल्या आहेत तेथील मतदारांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. सर्वच मतदान केंद्रांवर सुरक्षा वाढवण्यात आली. 

Add Zee News as a Preferred Source

उमेदवाराच्या नवऱ्याने ईव्हीएम मशिन फोडले

अकलूज नगरपालिका निवडणूक प्रभाग 7 मध्ये  उमेदवाराच्या नवऱ्याने ईव्हीएम मशिन फोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .मतदान करताना बटण दाबत नसल्याने उमेदवाराच्या नव-याने कृत्य केले. काही वेळानंतर ईव्हीम मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याचं पाहायला मिळालं

मतदाराने  ईव्हीएम फोडले

गडचांदूर येथे मतदानादरम्यान एका मतदाराने  ईव्हीएम फोडले.  प्रभाग क्रमांक 9 मधील आदर्श हिंदी सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यालय येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.  राम दुर्गे असं evm फोडणाऱ्या मतदाराचे नाव, "नगारा" या चिन्हा समोरील बटन दाबल्यावर कमळाचा लाईट लागत असल्याचा आरोप ईव्हीएम फोडणाऱ्या मतदाराने केला. पोलिसांनी राम दुर्गे याला ताब्यात घेतले. यानंतर नवीन ईव्हीएम लावून मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

दरम्यान, हिंगोलीच्या कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी लोकशाहीवरच नांगर फिरवल्याचं पाहायला मिळालं. संतोष बांगर मतदान करताना मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनजवळ उभं राहून घोषणाबाजी केली. ज्या मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जायला परवानगी नाही, त्या मतदान केंद्रात संतोष बांगर चक्क मोबाईल घेऊन गेले. एवढ्यावरच हे महाशय थांबले नाहीत, त्यांनी ईव्हीएम मशीनसमोर मोबाईल कॅमेराही सुरु केला.  संतोष बांगर मतदान करताना त्यांच्या कार्यकर्त्यांचा गराडाही पडला होता. कार्यकर्त्यांनीही मोबाईल कॅमेरे सुरु ठेवले होते.  एवढं कमी की काय संतोष बांगर यांनी ईव्हीएमजवळ घोषणाबाजीही केली. हा सगळा ड्रामा केल्यावर, नियमांचं वस्त्रहरण केल्यावरही संतोष बांगर यांचं मन भरलं नाही. त्यांनी त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या महिला मतदाराला बांगर यांनी मतदानाबाबत विचारायला सुरुवात केली. या प्रकरणी संतोष बांगर यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More