Sindhudurg District Bank Loan Scam : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार राजन तेली यांनी 4 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ धरत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर त्यांनी चारच दिवसात मोठा धमाका करत कोकणातील महायुतीत भकूंप केला आहे. त्यांनी सिंधुदुर्ग बँक कर्ज घोटाळ्यांसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी पहिलाच वार नितेश राणेंवर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार मंत्री नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. (Sindhudurg Bank loan scam mastermind Nitesh Rane Rajan Teli allegations konkan Mahayuti)
विशेष म्हणजे बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर यांनी कथित घोटाळ्याप्रकरणी तेली यांच्यासह आठ जणांची दिल्लीतील बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाकडे तक्रार करण्यात आला आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठीच तेली यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याची चर्चा महाराष्ट्रातील राजकारणात आहे. तर प्रवेशाच्या चार दिवसात त्यांनी नितेश राणेला या घोटाळा सूत्रधार म्हटलंय.
नितेश राणेंवर आरोप करताना राजन तेली म्हणाले की, रॉक्सस्टारला एकदा साडे सहा कोटी दिले, दुसऱ्यांदा 10 कोटी दिले. दुसरीकडे 20 हजार मानधनावर असलेल्या पीएला साडे सात कोटी कर्ज दिले. दाभोळच्या जागेवर तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे. तिथे असणाऱ्या आरोपीला त्याच्या नावाने 5- 5 कोटींची कर्ज दिली आहेत. हा घोटाळा बाहेर येऊ नये, मी केलेल्या तक्रारी दडपल्या जाव्यात यासाठी राजकीय सूडाने मला अडकवण्यासाठी प्रयत्न केला असा दावा त्यांनी केला आहे. माझ्यावर जी थकबाकी होती, ती सगळी मी भरलेली आहे. या प्रकरणी शासनाने लक्ष घालावे. ही बँक टिकली पाहिजे. कोकणात सहकारी क्षेत्र टिकले पाहिजे. जे भूमाफिया आहेत ते पालकमंत्री नितेश राणेंचे सगळीकडे बॅनर लावतात. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन योग्य न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी राजन तेली यांनी केली.
तर बँकेच्या अवैध कर्ज वाटपाच्या घोटाळ्यात मुख्य सुत्रधार मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हेच असल्याचा आरोप करत तेली यांनी कर्जवाटपाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलीस महासंचालकांकडे केली. राणे हे बँकेचे संचालक असून त्यांनी अध्यक्ष आणि सीईओंवर दबाव टाकून मोठ्या रकमांचे कर्जवाटप करतात असा दावा त्यांनी केला आहे. याबाबतच्या तक्रारी नाबार्डसह सहकार निबंधक आण स्थानिक पोलिसांकडे करण्यात आल्या आहेत. पण त्याची दखल घेण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.
केवळ राजकीय सुडापोटी आपल्याला अडकविण्यात आल्याचा आरोप करत तेलींनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे शिंदे सेनेतच नितेश राणे यांचे बंधू आमदार निलेश राणे हेही आहेत. त्यामुळे महायुतीसह शिंदे सेनेतही वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. आता तेली यांनी थेट मंत्री राणेंना टार्गेट केल्याने कोकणात पुन्हा तेली विरुध्द राणे असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. यामध्ये तेलींच्या आरोपांनंतर निलेश राणे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
1: राजन तेली यांनी कोणत्या पक्ष सोडला आणि कुठे प्रवेश केला?
उत्तर: विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर राजन तेली यांनी ४ दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांनी कोकणातील महायुतीत भूकंप आणला.
2: राजन तेली यांनी कोणावर काय आरोप केले?
उत्तर: राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्ज घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे असल्याचा गंभीर आरोप केला. त्यांनी पहिलाच वार नितेश राणेंवर केला.
3: बँक व्यवस्थापकाने काय केले?
उत्तर: बँकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर यांनी कथित घोटाळ्याप्रकरणी राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्लीतील बँक सुरक्षा आणि फसवणूक विभागाकडे तक्रार केली. या कारवाईपासून वाचण्यासाठी तेली यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याची चर्चा कोकणात रंगली आहे.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.