भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सहा वर्ष वाट पाहिली, सोलापूरात जे काही घडलं ते भयंकरच!

Solapur Crime News: सोलापुरात खून का बदला खून से घेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 13, 2025, 11:00 AM IST
भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सहा वर्ष वाट पाहिली, सोलापूरात जे काही घडलं ते भयंकरच!
solapur crime news man Murder brothers murdere after 6 yr hunt

Solapur Crime News: सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एकाने तब्बल सहा वर्ष वाट पाहिले. त्यानंतर सहा वर्षांनी भावाच्या मारेकरऱ्याचा बदला घेतला आहे. सोमवारी रात्री 11 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. सोलापूर शहरातील जोशी गल्लीत एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 

तुकाराम उर्फ रॉबट पांडुरंग सरवदे असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी उत्तम प्रकाश सरवदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मयत तुकाराम उर्फ रॉबट पांडुरंग सरवदे याने 2019 मध्ये संशयित आरोपी उत्तम सरवदे याचा भाऊ सागर सरवदे याचा खून केला होता. त्याच खुनाचा राग मनात धरुन आरोपीने सरवदेची हत्या केली. 

खूनाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उद्देशाने 10 मार्चला रात्री यातील आरोपीने त्याच्या घरासमोर उत्तम सरवदे याला मारहाण करुन गंभीर जखमी केले. मयत तुकाराम सरवदे याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितली. या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. 

हत्या झाल्यानंतर अवघ्या आठ तासात खून करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आठ तासांतच पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली आहे. जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. 

नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह आत्महत्या 

प्रेमसंबंधांच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर श्री.शनिदेव मंदिराजवळ घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली १६ जणांविरुद्ध नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, उज्ज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. नांदगाव) हिचे तिच्या गावातील ज्ञानेश्वर माधव पवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गावातील काही लोकांनी त्यांच्या नात्याला विरोध करत त्यांना वारंवार आत्महत्या करा अन्यथा ठार मारू अशी धमकी दिल्याने त्या मानसिक छळाला कंटाळून दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.