
राज्यात काही वाहतूकदारांचा संप सुरूच राहणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सोबतच्या बैठकीत ट्रक, टेम्पो आणि कंटेनरच्या मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप सुरू ठेवणार, असा पवित्रा महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक आणि प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बाबा शिंदेंनी घेतलीय. दरम्यान, शालेय बस आणि खासगी बस संघटनांना राज्य सरकारनं लेखी पत्र दिल्यानं त्यांनी संप सुरू करण्याआधीच माघार घेतली. शालेय बसचे सर्व ई-चलन मागे घेण्याचं आश्वासन मिळाल्यानं स्कूल बस ऑनर्स असोसिएशननं संपातून माघार घेतलीय.