पुणे : पैसे कुठे गुंतवायचे यावर पहिलं बऱ्याचदा उत्तर येतं की शेअर बाजारात गुंतवा. शेअर बाजारात गुंतवण्यात रिस्क मोठी असली तरी त्यातून मिळणारा फायदाही मोठा असतो. त्यामुळे अनेकजण शेअर बाजारात पैसे गुंतवतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर बाजारात पैसे गुंतवण्यावणं फक्त रिस्क नसतं तर ते जबाबदारीने गुंतवावे लागतात. कोणतीही माहिती न काढता पैसे गुंतवणं कधीही धोक्याचं ठरू शकतं. तुम्ही जर शेअर बाजारात पैसे गुंतवण्याचा प्लॅन करत असाल तर थांबा ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 


जर तुम्ही गुंतवणुक करण्याच्या विचारात असाल तर सावध राहा. कारण तुमच्यावर सायबर चोरट्यांची नजर आहे. पुण्यातील एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल 60 लाख 88 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. 



अनिकेत सतीश देशपांडे असं फसवणूक झालेल्या व्यापा-याचं नाव आहे. गेल्यावर्षी चोरट्यांनी त्यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला आणि गॅलक्सी ट्रेडर्स कंपनीकडून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात येत असल्याची बतावणी केली.


फसवणूक करणाऱ्याने देशपांडे यांच्याकडून ऑनलाईन ट्रॅजेक्शननं पैसेही घेतले. मत्र परतावा न मिळाल्यानं आपली फसवणूक झाल्याचं देशपांडे यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 


या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी 5 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी तुम्ही सर्व माहिती काढणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.