विधीमंडळात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; आमदार, मंत्र्यांना होतोय त्रास

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आलाय. मुंबईतील वाढत्या कुत्र्यांसंदर्भात भाजप आमदार अतुल भातखळकरांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विषय मांडला.

पूजा पवार | Updated: Dec 11, 2025, 08:03 PM IST
विधीमंडळात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; आमदार, मंत्र्यांना होतोय त्रास
(Photo Credit : Social Media)

Nagpur :  नागपूर शहरासह विधान भवनात परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. विधान भवन परिसरात मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे असल्याने त्याचा त्रास आवारातील आमदार,मंत्र्यांना होतोय. त्यामुळे आता भटके कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केलीय. 

Add Zee News as a Preferred Source

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आलाय. मुंबईतील वाढत्या कुत्र्यांसंदर्भात भाजप आमदार अतुल भातखळकरांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विषय मांडला. आणि त्यानंतर  विधानभवन परिसरातील भटक्या कुत्र्यांचा गंभीर मुद्दाही समोर आलाय. अधिवेशन काळात विधानभवन परिसरातील मोकाट कुत्रे अधिकारी, कर्मचारी आणि आमदारांना त्रासदायक ठरतायत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि त्यांची निवारा केंद्र यावरून सर्वपक्षीय आमदार आक्रमक झाले होते.

दरम्यान केवळ सत्ताधा-यांनी नाही तर विरोधकांनीही भटक्या कुत्र्यांवरून आक्रमक भूमिका घेतली. आमदाराला कुत्रा चावला तर कोण जबाबदार ? असा सवाल शिवसेना UBTचे आमदार सुनील प्रभूंनी विचारलाय. तर सगळे भटके कुत्रे पर्यावरण प्रेमींच्या घरात सोडावेत अशी मागणी आमदार महेश लांडेगेंनी केलीये. गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्यात. अनेकांना भटक्या कुत्र्यांमुळे आपला जीव गमवावा लागलाय,. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीनं जोर धरलाय.

शहर असो वा ग्रामीण भाग भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चाललीये. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललीये. नागपूरचं विधानभवनही या समस्येनं ग्रासलंय.  विधानभवन परिसरातील कुत्रे पकडण्यासाठी पालिका कर्मचारी प्रयत्न करतायत. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासन आणि प्राणीमित्र संघटना यांच्यात समन्वय साधणं आवश्यक आहे. 

FAQ : 

नागपूर शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या कशी आहे?
उत्तर: नागपूर शहरासह विधान भवन परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय, ज्यामुळे आमदार, मंत्री आणि इतरांना त्रास होत आहे.

विधान भवन परिसरातील भटक्या कुत्र्यांबाबत काय उपाययोजना सुरू आहेत?
उत्तर: विधान भवन परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे, आणि पालिका कर्मचारी यासाठी प्रयत्न करत आहेत.

हिवाळी अधिवेशनात भटक्या कुत्र्यांचा मुद्दा कसा चर्चेत आला?
उत्तर: मुंबईतील वाढत्या कुत्र्यांसंदर्भात भाजप आमदार अतुल भातखळकरांनी लक्षवेधी मांडली, आणि त्यानंतर विधान भवन परिसरातील भटक्या कुत्र्यांचा गंभीर मुद्दा समोर आला.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More