एक धक्कादायक बातमी नागपुरातून आली आहे. नागपूरच्या भोसले घराण्याशी संबंधित असलेली ऐतिहासिक तलवार एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाइन विक्रीला काढण्यात आली आहे. ही तलवार नागपूरचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम यांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. मात्र या लिलावाला भोसले घराण्याने विरोध केला आहे.
- भोसले घराण्याच्या तलावारीचा ऑनलाईन लिलाव
- भोसले घराण्याची तलवार न्यूयॉर्कमध्ये कशी?
- लिलावाला भोसले घराण्याचा विरोध
नागपूरमधील भोसले घराण्याच्या ऐतिहासिक तलवारीचा न्यूयॉर्कमध्ये लिलावर होणार आहे. एका आंतरराष्ट्रीय कंपनीनं ही तलवार ऑनलाईन विकायला काढली आहे. ही तलवार दुसरी तिसरी कुणाची नसून नागपूरचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांची असल्याचा दावा या कंपनीनं केला आहे. सोथबाय या ब्रिटीश कंपनीकडून या तलवारीचा लिलाव केला जाणार आहे. कंपनीने 7 हजार ग्रेट ब्रिटन पाऊंड म्हणजेच 7 लाख 95 हजारांपासून लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलावात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणं अनिवार्य आहे.
मात्र या लिलावाला भोसले घराण्याने विरोध केला आहे.
- युरोपियन शैलीतील तलवार
-तलवारीवर देवनागरी लिपी
-सोन्यानं जडवलेली मूठ
-हिरव्या विणलेल्या लोकरीची पकड
-तलवारीची एकेरी ब्लेड
-तलवार 124 सेमी लांबीची
मात्र ही तलवार ब्रिटीश कंपनीपर्यंत कशी पोहोचली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. याबाबत काही ऐतिहासिक संदर्भ दिले जात आहेत.
- 1853-1864मध्ये महाराज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसलेंच्या नेतृत्वात ब्रिटीशांसोबत लढाई
-ब्रिटिशांनी नागपूरकर भोसलेंचा खजिना लुटला
-अनेक रत्नजडीत दागदागिने, शस्त्रसाठा आणि तलवारींची लूट
-त्याच लुटीत ही तलवारही ब्रिटिशांकडे गेली असल्याची शक्यता
- कालांतराने तलवारीची विक्री झाल्याची शक्यता
भोसले घराण्याने लिलावाला विरोध केलाय. तसंच तलवार परत भोसले घराण्याकडे यावी यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं भोसले घराण्यानं सांगितलं आहे. तर वाघ नखं आणली तशी तलवारही सरकारने परत आणावी, इतिहासाची साक्ष जपण्याचं काम तरी सरकारने इमानदारीनं करावं असा सल्ला विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दिला आहे.
भोसले घराण्याच्या तलवारीसंदर्भात सरकारकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही तलवार परत आणण्यासाठी सरकारकडून काही प्रयत्न केले जाणार हे पाहावं लागणार आहे.