नागरिकांनो नवतपाला प्रारंभ झालाय, आरोग्याची काळजी घ्या!

विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्हात ४६ पॉईंट ३ अंश सेल्सिअस होतं... तर  नागपुरात पारा ४५ पॉईंट ७ अंशावर होता

Updated: May 26, 2018, 04:42 PM IST
नागरिकांनो नवतपाला प्रारंभ झालाय, आरोग्याची काळजी घ्या! title=

नागपूर : होरपळून काढणाऱ्या नवतपला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावर नवतपाला प्रारंभ होतो. या नक्षत्रात सूर्य आणि पृथ्वी यामधील अंतर खूप कमी होते. त्यामुळे पृथ्वीवर पडणारी सूर्यकिरणे नेहमीपेक्षा अधिक उष्ण असतात. त्यामुळे नवतपाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी विदर्भातल्या पाच जिल्ह्यांतला पारा ४५ अंश आणि त्याच्याही पलिकडे पोहोचला. पुढले दोन दिवस विदर्भात उन्हाची तीव्रता आणखी राहणार असल्याचं, प्रादेशिक हवामान विभागानं सांगितलंय.

विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्हात ४६ पॉईंट ३ अंश सेल्सिअस होतं... तर  नागपुरात पारा ४५ पॉईंट ७ अंशावर होता. त्याचवेळी वर्धा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यालाही सूर्याचा प्रकोप जाणवत होता. 

नेहमीप्रमाणे यंदाचाही उन्हाळा नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकायदायक ठरतोय... त्यामुळे तुम्हीच तुमची काळजी घ्या... भर दुपारी उन्हात फिरणं टाळा... सतत पाणी पीत राहा... शीतपेय घ्या, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय.