Nanded Crime News : शिक्षक हे नवी पिढी निर्माण करतात. मात्र, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना नांदेडमध्ये घडली आहे. एका शिक्षकाने दहावीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार केला आहे. शिक्षकाच्या अत्याचारानंतर ही अल्पवीयन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शिक्षकाच्या या कृत्याविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील ही घटना आहे. या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद करण्यात आला. इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजवून शिक्षकानेच वारंवार लैंगिक आत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षकाने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. यानंतर या अल्पवयीन विद्यार्थीनीचा गर्भपात देखील करण्यात आला.
ही घटनानंतर मुलीच्या कुटुंबीयांना कळाली. मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी शिक्षक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज बंद पाळण्यात आला. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला अटक करुन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
नागपूर पोलिसांनी कुख्यात गुंड रोशन शेखची धिंड काढलीये. ब्लॅकमेल करीत तसेच लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करत रोशनची धिंड काढली. खंडणी मागितल्या प्रकरणी तो कारागृहात होता. सहा महिन्यांपूर्वी रोशनने लग्नाचं आमिष देत एका तरुणीशी शारीरिक सबंध ठेवलं. रोशनचे अन्य मुलीशी सबंध असल्याच समजताच पिडीतीने लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे पीडित तरुणीला रोशनने मारहाण केली. एवढ्यावर न थांबता रोशने तिची आक्षेपार्ह क्लिप व्हायरल केली. या विरोधात पीडितेने सदर पोलिसात तक्रार दिली.तक्रारीनंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगार असलेल्या रोशन शेखला अटक करुन धिंड काढली.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
ENG
(20 ov) 253/7
|
VS |
IND
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 253/7
|
VS |
ENG
246/7(20 ov)
|
| India beat England by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 169/8
|
VS |
NZ
173/1(12.5 ov)
|
| New Zealand beat South Africa by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.