Tejasvee Ghosalkar : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भाजपच्या ताब्यात असून शुक्रवारी मुंबै बँक संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर यांच्या निधनाने रिक्त असलेले संचालकपद तेजस्वी यांना देण्यात आलं. यानंतर तेजस्वी यांनी नियुक्तीबद्दल भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला होता. पण त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता मुंबै बँक संचालकपदी तेजस्वी यांची नियुक्त राजकीय वर्तुळात एकच चर्चा होते आहे.
संचालक होताच तेजस्वी घोसाळकरांचे सूर बदलले, असं म्हटलं जातंय. तेजस्वी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत प्रवीण दरेकर यांचं आभार तर मानलेच आहे. शिवाय तेजस्वी यांनी शिवसेना UBT पक्षाला आरसा दाखवलाय. त्या म्हणाल्यात की, त्यांची नियुक्तीच्या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं चुकीचं आहे.
राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून काम करणे हाच सहकार धर्म असल्याचंही तेजस्वी घोसळकरांनी म्हटलंय. मुंबै बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर आज त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत दरेकरांसह सर्व संचालक मंडळाचे आभार मानले आहे.
माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या रिक्त असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर माझी एकमताने निवड केल्याबद्दल मी बँकेचे अध्यक्ष मा. प्रविणभाऊ दरेकर तसेच सर्व संचालक मंडळाचे मनापासून आभार मानते.
एक वर्षांपूर्वीच मी व माझे सासरे विनोद घोसाळकर आम्ही दरेकर साहेबांना भेटून याबाबत विनंती केली होती.
सहकारात राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणे हाच खरा सहकार धर्म आहे, त्यामुळे या निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणे अत्यंत चुकीचे ठरेल
हा माझा सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा व पहिलाच अध्याय आहे, मात्र माझ्या परिवाराने आजवर केलेल्या कामाचा अनुभव व अभिषेक यांच्या जवळ राहून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून मी चांगले काम करेल याची खात्री देते.
मी पुन्हा एकदा सर्व नेतृत्वाचे आभार मानते.
दरम्यान शिवसेनेचा राजीनामा आणि त्यानंतर मुंबै बँक संचालकपदी नियुक्ती आणि त्यासाठी प्रवीण दरेकर यांचे आभार, यामुळे तेजस्वी घोसाळकर भाजपचा वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता येणारा काळच सांगेल की, तेजस्वी या नेमकं काय निर्णय घेतात.
ENG
587(151 ov)
|
VS |
IND
77/3(20 ov)
|
Full Scorecard → |
HUN
(19.2 ov) 149
|
VS |
FRA
97(15.3 ov)
|
Hungary beat France by 52 runs | ||
Full Scorecard → |
MLT
(20 ov) 148/9
|
VS |
AUT
101(17.5 ov)
|
Malta beat Austria by 47 runs | ||
Full Scorecard → |
BEL
(8 ov) 141/1
|
VS |
ROM
78/6(8 ov)
|
Belgium beat Romania by 63 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.