सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : एका क्षणात होत्याचं नव्हत झालं. डोळ्यासमोर संसाराच्या चिंधड्या उडाल्या नंदेडमधील(Nanded) एका कुंटुबाला हा भयानक अनुभव आला आहे. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घर उद्धवस्त झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मात्र, प्रचंड नुकसान झाले आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅस सिलेंडर चा स्फोट झाल्याने पत्र्याचे संपूर्ण घर उध्वस्त होऊन संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनेच्या वेळी घरात सुदैवाने कोणीच नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नांदेड जिल्ह्यातील माहूर मध्ये ही घटना घडली. 


काही वेळाच्या अंतरात सलग दोन वेळा गॅस स्फोटाचे भयंकर आवाज झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते. दुसरा स्फोट एवढा मोठा होता की गॅसचे बारीक बारीक तुकडे घटनास्थळापासून 300 ते 400 मीटर पर्यंत उडून पडले. 
परिसरातील नागरिकांनी व नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून राख झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.