मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भयानक वाहतूक कोंडी! 5 KM पर्यंत वाहनांच्या लांबच लाब रांगा

 मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भयानक वाहतूक कोंडी झाली आहे.  5 KM पर्यंत वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Oct 18, 2025, 11:49 PM IST
  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भयानक वाहतूक कोंडी!  5 KM पर्यंत वाहनांच्या लांबच लाब रांगा

Mumbai–Pune Expressway Traffic :  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भयानक वाहतूक कोंडी झाली.  वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीत अडकल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.  पुण्याकडे जाणाऱ्या तसेच मुंबईकडे जाणाऱ्या लेन वर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सोशल मिडियावर वाहतूक कोंडीचे फोटो आण व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करु नये असा इशारा दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

दिवाळीच्या निमित्ताने हजारो लोक प्रवास करत आहेत. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पुणे लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अमृतांजन ब्रिजपासून ते खोपोली एक्सिटपर्यंत तब्बल वाहनांचा  गर्दी झाली. या वाहतूक कोंडीमुळे काही वाहने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवण्यात आली असून, त्यामुळे दस्तुरी पॉईंट परिसरातही मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. 

दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार-रविवार सलग आल्याने चाकरमाणी मुंबईकर आपआपल्या गावी निघाले आहेत, तर काही पर्यटक लोणावळा-खंडाळा परिसरात फिरण्यासाठी येत आहेत.आणि त्यामुळे महामार्गावर तासन्‌तास गाड्या अडकल्या आहेत. दरम्यान, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बोरघाट महामार्ग पोलीस शर्थीने प्रयत्न करत आहेत.
पुण्यातील नारायणगावातही मोठी वाहतूक कोंडी झाली. पुणे-नाशिक बायपासवर वाहनांच्या रांगा लागल्या. तीन तासांपासून वाहतूक ठप्प आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.

पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील, शिक्रापूर-सणसवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. दिवाळी सणानिमित्त नागरिक आपल्या गावी निघल्याने, महामार्गावर प्रचंड कोंडी झाली.  वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More