Chandrapur Mahapalika Controversy : चंद्रपूर महापालिका सत्ता स्थापनेत नवी घडामोड पुढे आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवार असे 10 नगरसेवक मुंबईकडे रवाना झालेत. अकोला येथ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची या दहा नगरसेवकांनी भेट घेतली. तसेच सत्ता स्थापना समीकरणाबाबत माहिती दिली. हे सर्व नगरसेवक मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष याबाबत कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे हे सर्व 10 नगरसेवक भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत एकूण 8 नगरसेवक निवडून आणले होते. यामध्ये उबाठाचे 6 तर वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक आहेत. या अधिकृत आठ नगरसेवकांच्या गटानं काँग्रेसच्या दोन बंडखोर नगरसेवकांना आपल्या बाजूला वळवत संख्या थेट दहापर्यंत नेली आहे. हे सर्व दहा नगरसेवक सध्या अकोल्यात असून त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील टप्प्यात हे नगरसेवक मुंबईत उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत. दरम्यान, चंद्रपूर मनपात महापौर पदावर उबाठा ठाम असल्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची अडचण वाढली आहे.चंद्रपूरच्या राजकारणात आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातला पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलीय. कारण खासदार प्रतिभा धानोकर यांनी काँग्रेसच्या 13 नगरसेवकांना सोबत घेत चंद्रपूर आयुक्त कार्यालयात गटनोंदणी केलीय. दरम्यान यानंतर वडेट्टीवारांच्या गटानंही स्वत:च्या नरसेवकांचं निवेदन सादर केलं होतं, मात्र, पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानंतर विजय वडेट्टीवारांना नमतं घ्यावं लागलंय. चंद्रपूर पालिकेतील सत्ता स्थापनेची सूत्र धानोरकरांनीच सांभाळावीत असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी एक पाऊल मागे घेतलं आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
IND
(20 ov) 175/7
|
VS |
PAK
114(18 ov)
|
| India beat Pakistan by 61 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 205/6
|
VS |
BRN
154/8(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(20 ov) 199/4
|
VS |
NAM
168/6(20 ov)
|
| USA beat Namibia by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.