'दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत द्या, नाहीतर...', संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेनं हंबरडा मोर्चा

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय,  शेतकरी पूर्ण:ताह उद्धवस्त झाला आहे. दरम्यान शेतक-यांना भरघोस मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरात मोर्चा काढला. 

पूजा पवार | Updated: Oct 11, 2025, 10:06 PM IST
'दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत द्या, नाहीतर...', संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेनं हंबरडा मोर्चा
(Photo Credit : Social Media)

विशाल करोळे (प्रतिनिधी) संभाजीनगर : संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेनं हंबरडा मोर्चा काढला. शेतक-यांसाठी सरकारनं केलेली मदत तुटपुंजी असल्याची टीका यावेळी करण्यात आलीये. तसंच शेतक-यांना लवकर मदत न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही ठाकरेंनी दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतक-यांचं अतोनात नुकसान झालंय,  शेतकरी पूर्ण:ताह उद्धवस्त झाला आहे. दरम्यान शेतक-यांना भरघोस मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरात मोर्चा काढला. या मोर्चामधून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला इशारा दिलाय. शेतक-यांची कर्जमाफी करा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरणार असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय. दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील ठाकरेंवर पलटवार केलाय.

शेतक-यांना मदत मिळाली की नाही?, याची ठाकरेंची शिवसेना पडताळणी करणार आहे. दिवाळीआधी शेतक-यांच्या खात्यात पैसा केले पाहिजे असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तर मोर्चा काढण्यापेक्षा ठाकरेंनी शेतक-यांना मदत करायला हवी होती असा टोला संजय शिरसाटांनी लगावलाय.

शेतक-यांना हेक्टरी 50 हजार द्यायला हवेत. मात्र, मोदींच्या दौ-याआधी पॅकेज जाहीर करून शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय.. तर उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना दिलेल्या मदतीचा अभ्यास करावा असं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलंय.

उद्धव ठाकरेंच्या संभाजीनगरमधील मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील टीका केली होती. ठाकरेंनी आरशात बघितलं असतं तर मोर्चा काढला नसता असा खोचक टोला फडणवीसांनी लगावला होता. दरम्यान फडणवीसांच्या टीकेला ठाकरेंनीही उत्तर दिलंय.

सरकारकडून शेतक-यांना देण्यात आलेल्या मदतीवरून ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. तसंच दिवाळीआधी पैसे खात्यात जमा करण्याचं आव्हान देखील त्यांनी केलंय. शेतक-यांना लवकर मदत न केल्यास पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

FAQ : 

संभाजीनगरात उद्धव ठाकरेंनी कोणता मोर्चा काढला आणि त्यामागे काय कारण आहे?
उत्तर: संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, सरकारची मदत तुटपुंजी असल्याची टीका करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. 

उद्धव ठाकरेंनी सरकारला कोणता इशारा दिला आहे?
उत्तर: शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरणार असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. तसेच, शेतकऱ्यांना लवकर मदत न केल्यास पुन्हा मैदानात उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांसाठी कोणती मदत मागितली गेली आहे?
उत्तर: शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यायला हवी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा करण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंनी सरकारला दिले आहे.

About the Author