ठाणे हादरले! 10 वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, नंतर मृतदेह सहाव्या मजल्यावरुन खाली फेकला

Thane Crime News: ठाण्यातील मुंब्रात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 9, 2025, 07:01 AM IST
ठाणे हादरले! 10 वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, नंतर मृतदेह सहाव्या मजल्यावरुन खाली फेकला
Thane Crime news Man rape minor girl and kills her by slitting throat before throwing body

Thane Crime News: ठाण्यातील मुंब्रा येथे एका 10 वर्षांच्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह इमारतीच्या डक्ट भागात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून परिसरातील नागरिकांनी मध्य रात्री पोलिस स्थानकात धाव घेऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपीला तीन तासांच्या आत ताब्यात घेतलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डिंगच्या डक्टमध्ये उंचावरुन काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने नागरिकांनी खिडकी उघडून टॉर्च लावून बघितले. तेव्हा अंदाजे दहा वर्षांची मुलगी पालथ्या अवस्थेत पडलेली दिसून आली. नागरिकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंब्रा पोलीसांनी घटनास्थळी जावून खात्री करून अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या साह्याने डक्टमधील मुलीस बाहेर काढून तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

पोलिसांनी सुरुवातीला मुलीच्या मृत्यूबाबत कस्मात मृत्यु दाखल करण्यात आला होता. मात्र मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्याने मुंब्रा पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जात तेथील लहान मुलांकडे चौकशी करून तसेच इतर पुरावे गोळा करून सदर बिल्डिंगमधील सर्व घरांच्या डक्टची पहाणी करून इतर साक्षीदार यांच्याकडे चौकशी केल्यानंतर सहाव्या मजल्यावरील 19 वर्षीय आसिफ अकबर मन्सुरी याला ताब्यात घेतलं. 

आसिफ अकबर मन्सुरी असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने मयत मुलीसोबत लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने अपहरण केले. तसंच, बलात्कारानंतर तिच्या गळ्यावर उजव्या बाजुस धारदार शस्त्राने भोसकून जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने इमारतीच्या डक्टमध्ये तिला फेकुन दिले अशी कबुली दिली. तसेच वैदयकीय अधिकरी यांनी मयत मुलीचे शवावविच्छेदन करून मुलीच्या मृत्यूचे कारण दिल्याने आरोपीत आसिफ अकबर मंन्सुरी विरूध्द मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा नोंद करून, त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More