Thane Municipal Corporation Election 2026 Jitendra Awhad : ठाणे महापालिका निवडणुकीच्या 2026 च्या प्रचारात मुंब्रा भागात मोठा वाद उफाळलेला दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा हा भाग मजबूत आधार मानला जातो. पण त्यांचा जुना सहकारी युनुस शेख यांनी आव्हाडांना जोरदार धक्का दिलाय. युनुस शेख आता एमआयएम पक्षात सामील झाले असून मुंब्रा येथील एका सभेत त्यांनी आव्हाडांवर शाब्दीक हल्ला चढवला. या आक्रमक भाषणानंतर स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून निवडणुकीच्या वातावरणात तणाव वाढलाय. तसेच या भाषणानंतर युनूस शेख आणि आव्हाड यांच्यातील मतभेद पुन्हा सर्वांसमोर आले आहेत. ज्यामुळे मुंब्रा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
युनुस शेख यांनी आपली मुलगी शहर शेखसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. पण जितेंद्र आव्हाड यानी ती नाकारली, असा आरोप शेख यानी केला. यामुळे नाराज होऊन शेख यांनी एमआयएम पक्षात एन्ट्री केली. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासमोर झालेल्या सभेत त्यांनी हे सारे उघड केले. या निर्णयामुळे शेख यांनी आव्हाडांना थेट आव्हान दिले.
Yunus Shaikh of MIM roasting Kaka's Mumbra boxer. pic.twitter.com/1r9jSsfAjJ
— Smita Deshmukh (@smitadeshmukh) January 12, 2026
जितेंद्र आव्हाड आणि युनुस शेख यांच्यातील मैत्रीचे संबंध 23 वर्षांपूर्वीचे आहेत. ते एकेकाळी खूप जवळचे मित्र आणि राजकीय साथीदार होते. पण गेल्या काही वर्षांत त्यांच्यात फूट पडली. मागील विधानसभा निवडणुकीत वचननामा कार्यक्रमात शेख याचा फोटो न लावल्यामुळेही वाद झाला होता. तेव्हापासून त्यांच्यातील विश्वास कमी होत गेला.
युनूस यांनी आव्हाडांना 'झुटा जितेंदर' म्हणून हिणवले. मी आजपासून त्याचे नाव बदलले आहे. तसेच 'तुतारीची मुतारी' अशी टीका करून पक्षाच्या चिन्हावरही हल्ला केला. डोके फिरले तर मुंब्रा येथे आव्हाडांना प्रवेशबंदी करेल, असा इशारा त्यांनी दिला. इतकेच नव्हे तर 'तुमच्या घरात येऊन पतंग उडवेन' असेही त्यांनी म्हटले. हे भाषण सोशल मीडियावर वेगाने पसरले आहे.
मुंब्रा हा जितेंद्र आव्हाडांचा मजबूत गड आहे. जिथे ते नेहमी मोठ्या फरकाने विजयी होतात. पण युनुस शेख सारख्या जुन्या साथीदाराने विरोध केल्यामुळे आव्हाडांना अडचण येऊ शकते. शेख याने एमआयएम उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. ज्यामुळे मतविभागणी होण्याची शक्यता आहे. या भागातील मुस्लिम आणि इतर मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
या सर्व घडामोडींवर जितेंद्र आव्हाड यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण निवडणुकीच्या दृष्टीने हे प्रकरण महत्त्वाचे आहे. मुंब्रा मतदार कोणाच्या बाजूने उभे राहतील, हे आगामी काळात स्पष्ट होईल. एमआयएम पक्षाची भूमिका आणि शेख यांच्या प्रयत्नांमुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
IRE
(20 ov) 235/5
|
VS |
OMA
139(18 ov)
|
| Ireland beat Oman by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(20 ov) 196/6
|
VS |
NED
103(15.5 ov)
|
| USA beat Netherlands by 93 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 201/4
|
VS |
BRN
170/5(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 31 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.