ठाणे-पालघर विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल
महाराष्ट्रात महायुतीचा जल्लोष
ठाणे - पालघर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. ठाणे पालघर मतदार संघात महायुतीने गड राखला आहे. ठाणे-पालघर विधानसभा निवडणुकीत नालासोपारा, वसई, कल्याण पश्चिम, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, मीरा-भाईंदर, माजिवाडा, कोपरी, ठाणे, मुंब्रा-कळवा, ऐरोली, बेलापूर हे महत्वाचे मतदार संघ होते. या मतदार संघापैकी उल्हासनगर, मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर यामध्ये अती-तटीची लढत पाहायला मिळाली. मीरा-भाईंदर विधानसभेत गीता जैन आणि नरेंद्र मेहता यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळाली.
निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार
पालघर मतदारसंघात विधानसभा निवडणूक पार पडली. पालघरमध्ये आदिवासी पाडे जास्त असून लोकसंख्येचा 2.69 टक्के मतदान हे अनुसुचित जाती आणि 30.96 टक्के मतदान हे अनुसुचित जमातींचे होते. 2019 विधानसभा निवडणुकीत 2 लाख 73 हजार 623 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 39 हजार 008 मतदार हे पुरूष असून 1 लाख 34 हजार 598 मतदार हे स्त्रिया आहेत. तर 17 मतदार हे तृतिपंथीय आहेत. 32 मतदार संघाकरता हे मतदान झाले.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पालघरमध्ये एकूण २१७७ मतदान केंद्रे उभारण्यात आले होते. यामध्ये डहाणू विधानसभा मतदारसंघात ३२७, विक्रमगडमध्ये ३४८, पालघरमध्ये ३२२, बोईसरमध्ये ३५३, नालासोपारा मध्ये ४८९ आणि वसई मतदार संघात ३३८ केंद्रांचा समावेश होता. डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई मतदार संघ पालघरमध्ये आहेत.
ठाणे - पालघर विधानसभा निवडणुकीचे विजयी उमेदवार
डहाणू (सीपीएम) विनोद निकुळे (71140)
विक्रमगड (राष्ट्रवादी) सुनील भुसारा (88264)
पालघर (शिवसेना) श्रीनिवास वनगा (67835)
बोईसर (बहुजन विकास आघाडी) राजेश पाटील (78,671)
नालासोपारा (बहुजन विकास आघाडी) क्षितीज ठाकूर (1,48,952)
वसई (बहुजन विकास आघाडी) हितेंद्र ठाकूर (97244)
भिवंडी-ग्रामीण (शिवसेना) शांतारम मोरे (83367)
शहापूर (काँग्रेस) दौलत दरोडा (75804)
भिवंडी पश्चिम (भाजपा) महेश चौघुले (58816)
भिवंडी पूर्व (समाजवादी पार्टी) रईस शेख (45531)
कल्याण पश्चिम (शिवसेना) विश्वनाथ भोईर (38314)
मुरबाड (भाजपा) किसन कठोरे (1,46894)
अंबरनाथ (शिवसेना) डॉ बालाजी किनीकर (59862)
उल्हासनगर (भाजपा)चे कुमार अलियानी (43577)
कल्याण पूर्व (भाजपा) गणपत गायकवाड (45413)
डोंबिवली (भाजपा) रविंद्र चव्हाण (86,110)
कल्याण ग्रामीण(मनेसे) प्रमोद (राजू)पाटील 90816
मिरा-भाईंदर (अपक्ष) गीता जैन (79,527)
माजिवाडा-ओवला (शिवसेना)प्रताप सरनाईक (1,05,769)
कोपरी-पाचपाखडी (शिवसना) एकनाथ शिंदे (1,06,667)
ठाणे मतदार संजय केळकर (91,771) मतांनी विजयी
मुंब्रा-कळवा (राष्ट्रवादी) जितेंद्र आव्हाड (1,09,014)
ऐरोली (भाजप) गणेश नाईक (1,14,038)
बेलापूर (भाजप) मंदा म्हात्रे (87518)