Aditi Tatkare : ठाणे जिल्ह्यातल्या महिला बालविकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या नावाखाली कोट्यवधीचा घोटाळा झी २४ तासाने उघड केला. या बातमीची दखल मंत्री आदिती तटकरेंनी घेतली.

Aditi Tatkare on Impact of Zee 24 Taas : ठाणे जिल्ह्यातल्या महिला बालविकास विभागात नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या नावाखाली कोट्यवधीचा घोटाळा झी २४ तासाने उघड केला. या बातमीची दखल मंत्री आदिती तटकरेंनी घेतली. संबंधित कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणार असं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. तसंच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार असून इतर जिल्ह्यातील स्थितीही तपासणार, असं आश्वासन अदिती तटकरे यांनी दिले आहेत. झी 24 तासच्या बातमीची सरकारकडून दखल घेण्यात आली असून 'महिला बालविकास अधिकाऱ्यांना नोटीस बजावणार असल्याचे मोठी घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली. त्यासोबत हा घोटाळा तपासण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचीही ग्वाही तटकरे यांनी झी २४ तासाला दिली.
झी २४ तासाच्या शोध पत्रकारामध्ये असं दिसून आलं की, ठाणे महिला व बालविकास विभागाने योजना देताना किंवा करार करताना कोणतेही नियम पाळले नाहीत. प्रस्ताव, निविदा, कार्यादेश, काम पूर्ण करण्याचा दाखला आणि बिलं ही पद्धत कुठल्याही पाळल्या गेल्यात नाहीत.
जांभूळ कृषी पर्यटन केंद्र योजनेसाठी 3 कोटी 50 लाखांचं बिल काढलं 4 मार्च 2021ला योजनेची निविदा एक दिवस नंतर म्हणजे 5 मार्च 2021 ला काढण्यात आली.
सर्जिकल कॉटन निर्मिती प्रकल्प भिवंडी 1 कोटी 52 लाख रुपयांचं बिल काढलं 13 जानेवारी 2022ला योजनेची निविदा काढली.
21 फेब्रुवारी 2022 ला काथ्या उद्योग चिंबीपाडा भिवंडी 1 कोटी रुपयांचं बिल काढलं 19 मार्च 2020ला योजनेची निविदा काढली.
22 एप्रिल 2020 ला या सगळ्यात सगळ्यात मोठा घोळ म्हणजे ठेकेदार ठरलेला नसताना बिलं काढण्यात आली आहेत.
याचाच अर्थ कंत्राट कुणाला मिळणार हे आधीच ठरलं होतं का असा प्रश्न या सगळ्या प्रकरणावरून समोर येत आहे. हा सगळा घोळ इथंच थांबत नाही नसून कंत्राटदारांचा आहे हे समोर आलं आहे. ठाण्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातून 2019 ते 2025 या सहा वर्षांत जेवढ्या योजना आणि कंत्राटं निघाली, ती कंत्राटं तीनच संस्थांना मिळाल्याचे तपासात समोर आलं आहे. या तीन संस्थांना 27 कंत्राटातून तब्बल 73 कोटींची खिरापत वाटण्यात आल्याचे कागदपत्र झी २४ तासाच्या हाती लागली आहेत. या तीन संस्थांच्या व्यक्तिरिक्त कोणत्याही संस्थेला कंत्राट मिळालं कधीच मिळाली नाही, हे धक्कादायक आहे.