सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : रौनकचे टॅलेंट पाहून त्याच्या आई वडिलांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ( INDIA BOOK OF RECORD ) आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डशी ( ASIA BOOK OF RECORD ) संपर्क साधला. रेकॉर्डसाठी रौनकच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोळ्यावर पट्टी असूनही रौनकने सर्वाधिक प्राणी ओळखले. तर, 1 मिनिट 38 सेकंदात 81 मानवी अवयव ओळखले. अशा पद्धतीने तो या 2 कॅटेगिरीसाठी यंगेस्ट किड ठरला.


नांदेडमध्ये राहणारा हा रौनक ठाकूर आहे अगदी तीन वर्षाचा. आई वडील दोघेही डॉक्टर.. दीड वर्षाचा असल्यापासून रौनकची स्मरणशक्ती खूपच चांगली. एकदा सांगितलेली गोष्ट त्याच्या लगेच लक्षात राहते.


रौनकला प्राण्यांची आवड असल्याने पालकांनी त्याला प्राण्यांची खेळणी आणून देण्यास सुरुवात केली. अगदी डोळ्यावर पट्टीबांधूनही रौनक क्षणार्धात प्राणी ओळखू लागला. तर लॅपटॉपवर बसून त्याने मानवी शरीरातील अवयव ओळखण्याची कलाही साध्य केली.


पाहता पाहता तो मानवी अवयव चुटकीसरशी सांगू लागला. रौनकच्या या बुद्धिमत्तेचे कौतुक केले जात आहे. या अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावरच त्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यंगेस्ट किड या नामांकनात आपलं नाव कमावलंय.