औरंगाबाद : तेलंगणा येथील एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे 'मी कुणाल उत्तर द्यायला आलो नाही. तुम्हाला उत्तर देऊ अशी तुमची लायकी नाही. माझा तरी एक खासदार आहे पण तू तर बेघर आहे. तुला घरातून काढलेलं आहे,' अशा शब्दात राज ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.
आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांच्या या टीकेला मनसेकडून जोरदार उत्तर देण्यात आलंय. ओवेसी सारख्या बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबड करू नये. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. यांना राज्य सरकारने वेसण घालावी आणि कारवाई करावी. महाराष्ट्रात काही धिंगाणा झाला आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर याला राज्य सरकार जबाबदार असेल. या धर्मांध ओवेसी बोकडांच्या दाढीचे केस कसे उपटायचे हे मनसे कार्यकर्त्याना माहीत आहे, असा इशारा मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे.
तर, हेमंत संबूस यांनी औरंगाबादमध्ये आज ओवैसीने जे केलं त्यांचा मनसेकडून निषेध केला. जलील नावातच जलील आहे. ते किती वेळा रायगडाला गेले. क्रांती चौक महाराजांच्या पुतळ्याला हार चढवला नाही. महाराष्ट्रावर जर प्रेम असतं तर असं केलं नसतं अशी टीका केलीय.
धार्मिक तेढ आम्ही निर्माण करत नाही. पण जसा रोग तसं औषध देतो. यांना लाज वाटत नाही. ज्या औरंगजेबने आपल्याला त्रास दिला. त्याला चादर चढवतात. धार्मिक तेढ हे निर्माण करत आहेत आम्ही नाही. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे हेमंत संबूस म्हणाले.