Satara News :  ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने उमेद अंतर्गत महिलाच्या बचत गटांना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे 30 पाझर तलाव देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 30 महिला बचत गटातील महिला या 30 पाझर तलावामध्ये मत्स्य पालन करून आता चांगला फायदा मिळवू शकणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून राज्यातील हा पहिला प्रकल्प म्हणाला जातो आहे. या मस्य पालनासाठी त्यांना मत्स्यबीजही पुरवण्यात आले आहेत. या पथदर्शी ठरलेल्या अभिनव उपक्रमामुळे जिल्ह्यातील 30 समुहातील सुमारे 300 महिलांना उपजीविकेची अनोखी संधी या निमित्ताने उपलब्ध झाले आहे. या राज्यातल्या अभिनव उपक्रमासाठी 30 पाझर तलावामध्ये सुमारे पाच लाखाहून अधिक मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत.


एका पाझर तलावातून कटला, रोह अशा माशांच्या प्रजातीतून वर्षाला सुमारे पाच लाखा पर्यंत निव्वळ नफा उत्पन्न अपेक्षित असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सांगितले आहे. या मत्स्य व्यवसायासाठी कातकरी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 


दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक 


सातारा जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या असून 23 डिसेंबर पासून दूध बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गाईच्या दुधाला 27 ते 28 रुपये दर मिळत असून म्हशीच्या दुधीला 47 रुपये दर मिळत असून बाजारपेठेतील दुधाच्या दराची किंमत पहिली असता ती दुप्पट आहे. शेतकऱ्यांना खूप कमी दर मिळत असल्याकारणाने त्यांचा खर्च सुद्धा भागत नसून सातारा जिल्ह्यातील सर्वच शेतकरी नाराज असल्याने दुधाला दर वाढ मिळणार नाही तो पर्यंत सर्व शेतकरी 23 डिसेंबर नंतर दूध संकलन केंद्रावर दूध घालणार नाहीत तसेच इतर जिल्ह्यातून होणारी दुधाची वाहतूक ही सुद्धा सातारा जिल्ह्यातून होऊन न देण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रमोद जगदाळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिला.